shri krushna janmashtami : श्रीकृष्णाच्या पत्नीने त्याच्याच वजनाऐवढे तराजूत ठेवल्या सोन्याच्या वस्तू, नेमकी कथा काय वाचा
मुंबई तक
15 Aug 2025 (अपडेटेड: 15 Aug 2025, 02:45 PM)
Shri Krushna janmashtami : कृष्ण जन्माष्टमी हा सण भाद्रपद महिन्यात संपूर्ण देशभरात साजरा केला जातो. हा सण श्रीकृष्णाचा जन्म दिवस म्हणून ओळखला जातो. हा सण आज संपूर्ण देशभरात 16 ऑगस्ट रोजी साजरा केला जात आहे. या दिवशी असंख्य भाविक श्रीकृष्णाची पूजा करतात.
ADVERTISEMENT


1/4
कृष्ण जन्माष्टमी हा सण भाद्रपद महिन्यात संपूर्ण देशभरात साजरा केला जातो. हा सण श्रीकृष्णाचा जन्म दिवस म्हणून ओळखला जातो. हा सण संपूर्ण देशभरात 16 ऑगस्ट रोजी साजरा केला जात आहे. या दिवशी असंख्य भाविक श्रीकृष्णाची पूजा करतात.


2/4
श्रद्धेनं जो भाविक पूजा करतो तेव्हा त्याच्या मनातील सर्व इच्छा आकांशा पूर्ण होतात. पूजा करताना श्रीकृष्णाचे पठण केले जाते. कृष्णाची आरती केली जाते. श्रीकृष्णाच्या अनेक कथा आहेत, त्याबाबत एक शिकवण देणारी कथा पुढील प्रमाणे वाचा.
ADVERTISEMENT


3/4
कोण होती सत्यभामा?
श्रीकृष्णाची पत्नी सत्यभामाचं रुप सुंदर होते. सत्यभामाला तिच्या धनावर आणि रुपड्यावर गर्व होता. श्रीकृष्णाच्या जन्मदिवशी तिने ठरवलं की, तिचं श्रीकृष्णावर किती प्रेम आहे हे तिनं दाखवून दिलं. सत्यभामाने एका तराजूत श्रीकृष्णाला बसवले आणि दुसऱ्या तराजूत सोन्याच्या वस्तू ठेवल्या. मात्र, श्रीकृष्णाचं वजन अधिक असल्याने पारडं जडच होतं. तेव्हा सत्यभामाचा अहंकार तुटला.


4/4
सत्यभामेनं रुक्मिणीला मदत मागितली होती. तिने रुक्मिणीला विचारले की, आता मी काय करावे? रुक्मिणीने बाहेर जाऊन तुळशीच्या झाडाची पाने तोडली आणि ती सोन्याच्या तराजूवर ठेवली होती. तुळशीची पाने ठेवताच श्रीकृष्णाच्या तराजूची एक बाजू वजनाने हलकी झाले आणि सोन्याची बाजू थोडी वरच्या दिशेला सरकली. थोडक्यात काय तर पैसे धन दौलतामध्ये प्रेम शोधू नये, तसेच अहंकारपणा हा असा या कथेचा बोध आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
