Aaditya Thackeray ची महाराष्ट्राला हाक! म्हणाले, “गद्दारांच्या राजवटीत तुमच्या मुलांची…”

भागवत हिरेकर

03 Jan 2024 (अपडेटेड: 03 Jan 2024, 09:35 AM)

Aaditya Thackeray Maharashtra politics : आमदार आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेला उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी विविध मुद्दे उपस्थित केले आहेत.

Aaditya thackeray wrote letter to people of maharashtra regarding voting against bjp and NDA

Aaditya thackeray wrote letter to people of maharashtra regarding voting against bjp and NDA

follow google news

Aaditya Thackeray Letter To Maharashtra : ‘ज्यांनी लोभापायी स्वतःला विकलं, जे उद्या आपलं भविष्य विकायलाही मागेपुढे बघणार नाही, अशा गद्दारांच्या राजवटीत तुमच्या मुलांची प्रगती, तुमची प्रगती होईल, असं तुम्हाला खरंच वाटतं का?”, असा सवाल करत आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेला हाक दिली आहे. आदित्य ठाकरेंनी दीर्घ पत्र लिहून त्यांचं म्हणणं मांडलं आहे.

हे वाचलं का?

आदित्य ठाकरेंनी लिहिलेल्या पत्रात काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे

आदित्य ठाकरेंनी सुरुवातीला म्हटलं आहे की, “महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर, पुन्हा लोकशाही अस्तित्वात आणणं हेच आपलं ध्येय आहे. 2022 च्या मध्यात गद्दारांच्या टोळीने आपल्या ह्या शांतीप्रिय आणि प्रगतीशील महाराष्ट्राचं रुपांतर बिल्डर्स आणि कंत्राटदार मिळून चालवत असलेल्या एका बेकायदेशीर राजवटीत केलं.”

राज्यातून बाहेर जात असलेल्या उद्योगांचा मुद्दाही आदित्य ठाकरेंनी मांडला आहे. ते म्हणाले आहेत की, “मागच्या 2 वर्षात, आपल्या राज्यात 2 लाखांहून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करू शकणारे उद्योग राजवटीच्या लाडक्या राज्यात पळवले गेले. नैसर्गिकरित्या त्यांनी नक्कीच महाराष्ट्राची निवड केली असती, पण त्यांना जबरदस्तीने दूर नेले गेले. देशभरातून अनेक लोक उदरनिर्वाहाची स्वप्नं घेऊन आपल्या राज्यात येता. पण, आपल्या राज्याला आणि ह्या लोकांना मात्र स्वप्नांपासून दूर नेलं जात आहे.”

महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार! शिंदेचे 7 खासदार, तर काँग्रेसचे 9 नेते भाजपच्या वाटेवर?

आदित्य ठाकरे पत्रात म्हणतात, “आता आपण ठरवायला हवं की, आपल्याला आपल्या राज्यासाठी, शहरासाठी आपल्या शेतीसाठी आपल्या परिसरासाठी आणि आपल्या स्वतःसाठी काय हवंय?”

“महाराष्ट्राचा अभिमान, वैभव लुटण्याचा प्रयत्न ही महाराष्ट्र विरोधी राजवट करत आहे, अशा राजवटीत तुमचं उज्ज्वल भविष्य घडू शकेल असं तुम्हाला वाटतं का?”, असा सवाल आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेला केला आहे.

हेही वाचा >> संजय राऊतांचा फडणवीस, शेलारांना ‘जालीम डोस’! दाखवला वाजपेयी-आडवाणींचा व्हिडीओ

“हे वर्ष आपल्यासाठी केवळ विचार करायचं नाही, तर कृती करण्याचं आहे. ही कृती म्हणजे तुमचं ‘मत’. तुमचं मत हे तुमचं भविष्य आपलं भविष्य आहे. सत्याच्या आणि न्यायाच्या बाजूने लढणाऱ्यांना ह्या हुकुमशाहीत त्रास दिला जाईल, अडचणीत आणलं जाईल, पण हा लढा जर आपण मिळून लढलो, तर अंतिम विजय सत्याचाच आहे”, असे आवाहन आदित्य ठाकरेंनी केलं आहे.

आदित्य ठाकरे यांचं वाचा जसंच्या तसं

    follow whatsapp