Vaibhav Kale: मराठी लष्कर अधिकारी गाझापट्टीत शहीद, कोण होते वैभव काळे?

Who is Vaibhav Kale : संयुक्त राष्ट्रसंघाच्या विविध मोहिमांसाठी काम करणारे भारतीय लष्करातील निवृत्त अधिकारी वैभव काळे हे गाझापट्टीत शहीद झाले आहेत. वैभव काळे हे पुण्यात राहत होते. यादरम्यान, महिन्याभरापूर्वी ते संयुक्त राष्ट्र संघात सुरक्षा सेवा निरीक्षक म्हणून रुजू झाले होते.

Mumbai Tak

रोहिणी ठोंबरे

15 May 2024 (अपडेटेड: 15 May 2024, 11:20 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

शहीद वैभव काळे यांच्यासोबत नेमकं काय घडलं?

point

शहीद वैभव काळे महिन्याभरापूर्वी संयुक्त राष्ट्र संघात सुरक्षा सेवा निरीक्षक म्हणून रुजू झाले होते

point

प्रकरणाच्या चौकशीसाठी संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस यांची मागणी

Indian Army Officer martyred in Gaza war : गेल्या वर्षभरापासून इस्रायल (Israel) आणि पॅलेस्टाइनमध्ये (Palestine) पेटलेलं युद्ध आजही सुरूच आहे. या युद्धात तेथील अनेकांना आपला जीव गमवावा लागला, हे अतिशय दु:खद आहे. पण आज भारतासाठीही तिथून दु:खद बातमी आली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या विविध मोहिमांसाठी काम करणारे भारतीय लष्करातील (Indian Army) निवृत्त अधिकारी वैभव काळे (46) हे गाझापट्टीत शहीद झाले आहेत. (who is maharashtrian army officer vaibhav kale martyred in Gaza Strip attack)

हे वाचलं का?

शहीद वैभव काळे यांच्यासोबत नेमकं काय घडलं?

गाझा येथील राफा भागातून रुग्णालयात जात असताना तिथे झालेल्या हल्ल्यात वैभव काळेंना वीरमरण आले. या घटनेचा संयुक्त राष्ट्राने निषेध केला. शहीद वैभव काळे यांनी भारतीय लष्करात अनेक मोहिमांमध्ये सहभाग घेतला होता. त्यात ते सियाचिन ग्लेशियर, द्रास, संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतीसेनेचा भाग म्हणून काँगोमध्ये आघाडीवर होते.  

हेही वाचा : "एकनाथ शिंदे 7-8 तासांसाठी मुख्यमंत्रीही झाले होते", फडणवीसांचा स्फोटक दावा

शहीद वैभव काळे हे पुण्यात राहत होते. ते मूळचे नागपूरचे आहेत. महिन्याभरापूर्वी ते संयुक्त राष्ट्र संघात सुरक्षा सेवा निरीक्षक म्हणून रुजू झाले होते, याबाबतची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. काळे यांच्या पार्थिवावर पुण्यातच अंत्यसंस्कार होणार असल्याचे त्यांचे मेहुणे निवृत्त विंग कमांडर प्रशांत कार्डे यांनी सांगितले.

युनायटेड नेशन्सचे डेप्युटी प्रवक्ता फरहान हक यांनी जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, 46 वर्षीय वैभव काळे हे एक महिन्यापूर्वीच गाझा येथील युनायटेड नेशन्स डिपार्टमेंट ऑफ सेफ्टी अँड सिक्युरिटी (DSS) मध्ये सुरक्षा सेवा समन्वयक म्हणून रुजू झाले होते. अनिल काळे हे युनायटेड नेशन्सचे स्टिकर लावलेल्या कारमधून प्रवास करत होते, त्यांच्या गाडीवर संयुक्त राष्ट्राचा ध्वजही लावण्यात आला होता. 

हेही वाचा : Uddhav Thackeray : ठाकरेंचा PM मोदींसह पटेलांवर हल्ला

संयुक्त राष्ट्राच्या सरचिटणीसांकडून प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी

मिळालेल्या माहितीनुसार, वैभव काळे यांनी 2022 मध्ये मुदतपूर्व निवृत्ती घेतली होती. संयुक्त राष्ट्र संघाच्या निवेदनानुसार, वैभव काळे हे त्यांच्या सहकाऱ्यासह युएनच्या वाहनातून राफा येथील युरोपियन रुग्णालयात जात असताना सकाळी हा हल्ला झाला. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी संयुक्त राष्ट्राच्या कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

हेही वाचा : सोन्याच्या 4 अंगठ्या, बँकेत...; मोदींकडे किती संपत्ती?

संयुक्त राष्ट्राच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनावर गोळीबार कोणी केला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. वैभव अनिल काळे यांच्यासोबत संयुक्त राष्ट्राचा आणखी एक मदत कर्मचारीही प्रवास करत होता. इस्रायल-गाझा संघर्षात संयुक्त राष्ट्राच्या जवानाला जीव गमवावा लागण्याची ही पहिलीच वेळ आहे.

    follow whatsapp