Devendra Fadnavis : "एकनाथ शिंदे 7-8 तासांसाठी मुख्यमंत्रीही झाले होते"

मुंबई तक

ADVERTISEMENT

एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाबद्दल फडणवीसांचा मोठा दावा.
देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

एकनाथ शिंदे यांच्याबद्दल देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

point

"उद्धव ठाकरेंनी शिंदेंना सांगितलं होतं मुख्यमंत्री करणार"

point

देवेंद्र फडणवीसांच्या विधानाची चर्चा

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray, Eknath Shinde : उद्धव ठाकरे आणि शरद पवारांबद्दल महाराष्ट्रात सहानुभूती असल्याची चर्चा सातत्याने सगळीकडे सुरू आहे. याच मुद्द्यासंदर्भात जेव्हा देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारला गेला, तेव्हा त्यांनी एक खळबळ उडवून देणारा गौप्यस्फोट केला. (Devendra Fadnavis stated that Eknath Shinde had become Chief Minister for seven to eight hours in 2019)

ADVERTISEMENT

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून एकमेकांची पोलखोल करण्याचे प्रयत्न होत असल्याचे दिसत आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असून, आता देवेंद्र फडणवीस यांनी एक स्फोटक विधान केले आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केले. 

'पवार-ठाकरेंना सहानुभूती', फडणवीस म्हणाले...

ठाकरे, पवार यांना सहानुभूती असल्याच्या मुद्द्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, "पक्ष फोडणे, घर फोडणे यात शरद पवारांचा हातखंडा आहे. मग त्यांना कशी काय सहानुभूती मिळेल?", असा सवाल त्यांनी केला.

हे वाचलं का?

हेही वाचा >> सोन्याच्या 4 अंगठ्या, बँकेत...; मोदींकडे किती संपत्ती? 

"खूप अन्याय झाला तर सहानुभूती मिळते; मात्र पक्षात फोडाफोडीची सुरूवातच शरद पवारांनी केली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली त्यांच्याकडे घराणेशाही लादली गेली", असा दावा फडणवीसांनी केला.  

ठाकरेंना केलं टार्गेट, फडणवीसांनी सांगितले पडद्यामागे काय घडलं?

मुलाखतीत फडणवीस म्हणाले की, "एकनाथ शिंदे हे कायम पक्षासाठी एकनिष्ठ राहिले. मात्र, त्यांचे नेते उद्धव ठाकरे हे कट्टर हिंदुत्वाकडून काँग्रेसकडे झुकले. त्यांनी आदित्यला मोठे करण्यासाठी एकनाथ शिंदे यांचे पंख कापायला सुरूवात केली."

ADVERTISEMENT

हेही वाचा >> ...अन् पंतप्रधान मोदींना अश्रू अनावर झाले!

"वास्तविक, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिंदे यांनी नेतृत्व केले होते. त्यानंतरच्या राजकीय घडामोडींमध्येही ते होते. त्यांच्यावरच अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. सरकार स्थापन होईल तेव्हा तुम्हीच मुख्यमंत्री असेही शिंदे यांना सांगण्यात आले होते.

ADVERTISEMENT

शिंदेंच्या मुख्यमंत्री होण्याबद्दल फडणवीसांनी काय सांगितलं?

"तसे ते सात ते आठ तासांसाठी मुख्यमंत्रीही झाले होते. त्यांच्या घरी तशाप्रकारची पोलीस सुरक्षाव्यवस्थाही तैनात करण्यात आली होती. मात्र, नंतर उद्धव ठाकरे यांनी निर्णय बदलून स्वतःच मुख्यमंत्री होण्याचा निर्णय घेतला."

हेही वाचा >> पवार, ठाकरेंना मोदींची 'ऑफर', चार राजकीय अर्थ!

"२००४ मध्येही जेव्हा नारायण राणे सामर्थ्यशाली झाले, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्यांना दूर केले होते. शिंदे यांच्या खात्याच्या बैठकाही आदित्य ठाकरे घेत होते. राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने शिंदे यांनी पुढे बंड केले. त्यामुळे अशा पक्षांना वा त्यांच्या प्रमुखांना सहानुभूतीची मते मिळणार नाहीत", असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT