सासू, सून आणि 'तो', दफन केलेला मृतदेह बाहेर काढल्यानंतर धक्कादायक हत्याकांडाचा उलगडा

मुंबई तक

Crime News : जर वासनेने माणसाच्या मनावर नियंत्रण मिळवले तर माणूस कोणत्या थराला जाईल सांगता येत नाही. या वासनेमुळे माणसाला नातीगोती, आपुलकी असं काहीच दिसत नाही. एका सुनेने देखील वासनेच्या आहारी जाऊन आपल्या सासूची हत्या केली आहे. सासूने आपल्या सुनेला शेजाऱ्यासोबत आक्षेपार्ह अवस्थेत बघितले. यामुळे आपले अनैतिक संबंध बाहेर येण्याच्या भीतीने सुनेनं आपल्या सासूचा प्रियकराच्या मदतीने शेवट केला.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सासू, सून आणि 'तो'

point

दफन केलेला मृतदेह बाहेर काढल्यानंतर धक्कादायक हत्याकांडाचा उलगडा

Crime News : जर वासनेने माणसाच्या मनावर नियंत्रण मिळवले तर माणूस कोणत्या थराला जाईल सांगता येत नाही. या वासनेमुळे माणसाला नातीगोती, आपुलकी असं काहीच दिसत नाही. एका सुनेने देखील वासनेच्या आहारी जाऊन आपल्या सासूची हत्या केली आहे. सासूने आपल्या सुनेला शेजाऱ्यासोबत आक्षेपार्ह अवस्थेत बघितले. यामुळे आपले अनैतिक संबंध बाहेर येण्याच्या भीतीने सुनेनं आपल्या सासूचा प्रियकराच्या मदतीने शेवट केला. उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील ही घटना आहे. मात्र या हत्येचा उलगडा कसा झाली याची कहाणी थरारक आहे. ही कहाणी नेमकी काय आहे, जाणून घेऊया.

हे ही वाचा : लग्नानंतर वर्षाच्या आत नवऱ्याचा मृत्यू, वहिनीचा दीराकडे लग्नासाठी हट्ट, शेवटी जंगलात मीठ टाकलेली बॉडी सापडली

सासूने सुनेला आक्षेपार्ह अवस्थेत बघितले

मिळालेल्या माहितीनुसार, हिना असं सुनेचं नाव आहे. मृत सासू अन्वरी बेगम यांचा मुलगा अमीर आणि पती अन्वर हे कामाच्या निमित्ताने घराबाहेर राहत असत. 2 मार्च रोजी रात्री उशिरा हिनाचा शेजारी राहणारा प्रियकर आदिल तिला भेटण्यासाठी घरी आला होता. याच दरम्यान सासू अनवरी बेगम यांनी त्या दोघांना आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहात पकडले. आपण पकडले गेलो आहोत आणि आता समाजात बदनामी होईल, या भीतीने हिना आणि आदिलने संतापून अनवरी बेगम यांच्या तोंडावर उशी ठेवून त्यांचा श्वास गुदमरवून खून केला.

हॉर्ट अॅटॅकमुळे मृत्यू झाल्याचा बनाव

हा गुन्हा केल्यानंतर सुनेने अतिशय चलाखीने घरच्यांना माहिती दिली की, सासूचा मृत्यू हार्ट अॅटॅकमुळे झाला आहे. घरात पुरुष मंडळी नसल्याने आणि सुनेच्या बोलण्यावर विश्वास ठेवून नातेवाईकांनी अनवरी बेगम यांचा मृतदेह घाईघाईने स्मशानभूमीत दफन केला. मात्र, काही दिवसांनंतर पती अन्वर घरी परतल्यावर त्यांना शेजाऱ्यांकडून काही संशयास्पद गोष्टी समजल्या. पत्नीचा मृत्यू नैसर्गिक नसून तिची हत्या झाली असावी, असा संशय अन्वर यांना आला. त्यांनी तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेऊन न्यायाची मागणी केली आणि मृतदेहाच्या पोस्ट मार्टमची मागणी केली.

हे वाचलं का?

    follow whatsapp