काळ्या जादूमुळे बिझनेसमध्ये नुकसान, अल्पवयीन मुलांच्या मदतीने फिल्मी स्टाईल हत्या; मित्रानेच रचला भयानक कट

मुंबई तक

Crime News : बेंगलोरजवळील अनेकलमध्ये एका प्रसिद्ध रिअल इस्टेट व्यावसायिकाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोपाळ असे मृत व्यावसायिकाचे नाव असून, या हत्येमागे त्याचा माजी व्यावसायिक भागीदार मोहन बाबू याचे नाव समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गोपाळ आपल्याविरुद्ध करणी करत असून त्यामुळेच व्यवसायात नुकसान होत असल्याचा संशय मोहनला होता.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

काळ्या जादूमुळे बिझनेसमध्ये नुकसान

point

अल्पवयीन मुलांच्या मदतीने फिल्मी स्टाईल हत्या

point

मित्रानेच रचला भयानक कट

Crime News : बेंगलोरजवळील अनेकलमध्ये एका प्रसिद्ध रिअल इस्टेट व्यावसायिकाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोपाळ असे मृत व्यावसायिकाचे नाव असून, या हत्येमागे त्याचा माजी व्यावसायिक भागीदार मोहन बाबू याचे नाव समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गोपाळ आपल्याविरुद्ध करणी करत असून त्यामुळेच व्यवसायात नुकसान होत असल्याचा संशय मोहनला होता. या प्रकरणी पोलिसांनी तामिळनाडूतील कृष्णगिरी येथून दोन अल्पवयीन मुलांसह एकूण आठ जणांना अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

हे ही वाचा : तीन मुली झाल्या, दुसरं लग्न करण्याची परवानगी दे, सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची विष प्राशन करून आत्महत्या

फिल्मी स्टाईलने अपहरण आणि हत्या

ही घटना रविवारी (8 मार्च) संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली, जेव्हा गोपाळ आपला मित्र सतीशसोबत एसयूव्ही कारमधून जात होता. अनेकल नावाच्या एका ठिकाणाजवळ एका मालवाहू गाडीने त्यांच्या कारला मुद्दाम धडक दिली, ज्यामुळे त्यांना गाडी थांबवावी लागली. गोपाळ आणि सतीश कारमधून खाली उतरताच हल्लेखोरांनी सतीशच्या चेहऱ्यावर केमिकल टाकले आणि गोपाळला जबरदस्तीने दुसऱ्या गाडीत टाकून त्याचे अपहरण केले. दुसऱ्या दिवशी सकाळी कृष्णगिरी पोलिसांना रस्त्याच्या कडेला एक मृतदेह सापडला, ज्याची ओळख नंतर गोपाळ म्हणून पटली.

काळी जादू करत असल्याचा संशय

गोपाळची पत्नी स्वाती हिने दिलेल्या जबाबानुसार या हत्येला मोहन बाबूच जबाबदार आहे. स्वातीने दावा केला आहे की, गेल्या वर्षीही मोहन आणि त्याच्या साथीदारांनी गोपाळवर हल्ला केला होता, मात्र मोहनच्या दबावामुळे त्यांनी त्यावेळी पोलिसात तक्रार केली नव्हती. स्वातीच्या या आरोपानंतर पोलिसांनी मोहनला ताब्यात घेऊन चौकशी केली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. गेल्या पाच वर्षांपासून गोपाळने स्वतःचे स्वतंत्र व्यवहार सुरू केले होते, ज्यात त्याला मोठा नफा मिळत होता, तर दुसरीकडे मोहनला व्यवसायात तोटा सहन करावा लागत होता.

हे वाचलं का?

    follow whatsapp