बापाने ओलांडली क्रूरतेची परिसिमा, 11 आणि 6 वर्षीय मुलींवर लैंगिक आत्याचार, आईचा धक्कादायक आरोप
Crime News : माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दोन अल्पवयीन मुलीवर बापाने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप एका महिलेनं केला आहे. संबंधित प्रकरणात पीडितेच्या आईने नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीचा तपास सुरु केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'11 आणि 6 वर्षीय निष्पाप मुलींचे बापाकडून शोषण'
दोन्ही अल्पवयीन मुलींना शारीरिक आणि मानसिक आजार
Crime News : जम्मूच्या सीमावर्ती भागात आरएस पुरा भागात माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दोन अल्पवयीन मुलीवर बापाने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप एका महिलेनं केला आहे. संबंधित प्रकरणात पीडितेच्या आईने नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीचा तपास सुरु केला. संबंधित प्रकरणाचा पोलिसांनी खुलासा केल्याची माहिती वृत्तमाध्यम देत आहेत.
हे ही वाचा : सुनेनं सासूच्या तोंडात कोंबला बोळा अन् गुप्तांगात टाकली मिरचीची पूड, नंतर घडलं भलतंच...
'11 आणि 6 वर्षीय निष्पाप मुलींचे बापाकडून शोषण'
महिलेनं पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. तिचा पती माखनलाल गेल्या काही काळापासून 11 आणि 6 वर्षीय निष्पाप मुलींचे शोषण करत असल्याचा तिचा आरोप आहे. संबंधित प्रकरणात महिलेच्या म्हणण्यानुसार, घरात एकत्र राहत असताना हे घृणास्पद कृत्य घडले होते. आरोपी बापाने मुलींना धाक धाकवून त्यांची अब्रू लुटली.
दोन्ही अल्पवयीन मुलींना शारीरिक आणि मानसिक आजार
या घृणास्पद कृत्यात दोन्ही अल्पवयीन मुलींना गंभीर शारीरिक आणि मानसिक आजार झाला. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळपणे कारवाई केली. पोलिसांनी आरोपी वडील माखनलाल विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची पुष्टी केल्यानंतर महिलेकडून तक्रार करण्यात आली असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
हे ही वाचा : ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत अल्पवीन मुलीवर लैंगिक अत्याचार, 18 वर्षानंतर लग्नासाठी आणला दबाव अखेर...
संबंधित तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पोलीस प्रत्येक कोनातून तपास करत आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतर कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे. या घटनेनं स्थानिक रहिवाशांमध्ये आरोपीविरुद्ध संताप निर्माण झाला. मुलांच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी देखील अशा घटना घडून नये आणि आरोपीला शिक्षा व्हावी अशी मागणी केली.










