पुजाराच्या पत्नीचं शेजारच्या ट्रक ड्रायव्हरशी अफेअर, अडथळा ठरणाऱ्या पुजाऱ्याचा केला मर्डर, अंत्यविधीला आरोपींची हजेरी

मुंबई तक

Crime News : आरोपी शालिनीचे तिचे शेजारी राहणाऱ्या हरीश नावाच्या ट्रक ड्रायव्हरशी प्रेमसंबंध होते. वर्षभरापूर्वी सिद्धलिंगप्पा यांना या प्रकरणाची माहिती मिळाली होती, त्यावरून पती-पत्नीमध्ये सतत वाद होत होते. महिनाभरापूर्वी हे भांडण विकोपाला गेल्याने शालिनीने पतीचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुजाराच्या पत्नीचं शेजारच्या ट्रक ड्रायव्हरशी अफेअर

point

अडथळा ठरणाऱ्या पुजाऱ्याचा केला मर्डर, अंत्यविधीला आरोपींची हजेरी

Crime News : शेजारच्या ट्रक ड्रायव्हरसोबत असलेल्या प्रेम संबंधात अडथळा ठरत असलेल्या पुजारी पतीची त्याच्या पत्नीनेच हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी बुधवारी त्याची पत्नी, तिचा प्रियकर आणि इतर दोघांना अटक केली आहे. सिद्धलिंगप्पा एम. एस. असे मृत पुजाऱ्याचे नाव असून, ते 6 मार्चपासून बेपत्ता होते. 7 मार्च रोजी त्यांचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास केला असता, ही हत्या त्यांच्याच पत्नीने प्रियकराच्या मदतीने घडवून आणल्याचे उघड झाले. शालिनी (32), एम. सी. हरीश (33), संतोष कुमार (29) आणि गणेश (29) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ही घटना कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यात घडली. 

हेही वाचा : शेळ्या चरायला घेऊन गेलेल्या मुलीवर झुडपात सामूहिक अत्याचार, पीडित तरुणी शेतात आढळली

अधिकची माहिती अशी की, घटनेच्या दिवशी म्हणजे 6 मार्च रोजी दुपारी 3 च्या सुमारास सिद्धलिंगप्पा गणपती मंदिरात पूजेसाठी घराबाहेर पडले होते. संध्याकाळी 4 वाजता त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी 10-15 मिनिटांत घरी पोहोचतो असे सांगितले. मात्र, रात्री उशिरापर्यंत ते न परतल्याने शोधमोहीम सुरू झाली. चिक देवरया सागर कालव्याजवळ त्यांच्या चपला, रक्ताचे डाग आणि पूजेचे साहित्य विखुरलेले आढळले, तर त्यांची दुचाकी पाण्यात बुडवलेली होती. या संशयास्पद बाबींमुळे नातेवाईकांनी तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 (1) व 238 नुसार गुन्हा नोंदवला.

हेही वाचा : CRPF जवानाला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा, हॉटेल बुक करुन स्वत:च्याच अल्पवयीन मुलींवर करायचा अत्याचार, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

हे वाचलं का?

    follow whatsapp