'मुलाचा वाढदिवस आहे, घरी ये..' तरुणाला रुममध्ये नेलं अन्.. महिलेने 'असा' रचला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा सापळा

मुंबई तक

Crime News : हनी ट्रॅपचे एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. एका महिलेने आपल्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीचे निमित्त साधून एका तरुणाला घरी बोलावले आणि त्याला जाळ्यात अडकवून त्याचा अश्लील व्हिडिओ तयार केला. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणाकडे एक लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'मुलाचा वाढदिवस आहे, घरी ये' तरुणाला रुममध्ये नेलं अन्..

point

महिलेने 'असा' रचला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा सापळा

Crime News : हनी ट्रॅपचे एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. एका महिलेने आपल्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीचे निमित्त साधून एका तरुणाला घरी बोलावले आणि त्याला जाळ्यात अडकवून त्याचा अश्लील व्हिडिओ तयार केला. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणाकडे एक लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. पीडित तरुणाने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. छत्तीसगडच्या बिलासपूर जिल्ह्यातील ही घटना आहे.

हे  ही वाचा : अश्लील व्हिडिओ दाखवून विद्यार्थिनींशी चाळे, गावातील महिलांनी भर चौकात शिक्षकाला चपलेने बदडले; भंडाऱ्यातील धक्कादायक प्रकार

मुलाचा वाढदिवस असल्याचे सांगून घरी बोलवले अन्

मिळालेल्या माहितीनुसार,  नोहर कुमार सूर्यवंशी (33) हा ट्रॅक्टर चालक म्हणून काम करतो. त्याची ओळख जवळच्या गावातील एका महिलेशी होती. 1 फेब्रुवारी रोजी या महिलेने मुलाचा वाढदिवस असल्याचे सांगून नोहरला आपल्या घरी निमंत्रित केले. नोहर तिथे पोहोचला तेव्हा घरात आधीच दुसरी एक महिला उपस्थित होती. आरोपी महिलेने या कटाची पूर्वतयारी केली होती. तिने नोहर आणि त्या दुसऱ्या महिलेला एका खोलीत पाठवले, जिथे त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले.

मोबाईलवर गुप्तपणे शुटिंग

यादरम्यान, आरोपी महिलेने खोलीत गुप्तपणे मोबाईल फोन सुरू करून ठेवला होता, ज्यामध्ये संपूर्ण घटनेचे चित्रीकरण करण्यात आले. विशेष म्हणजे, तरुणाला संशय येऊ नये म्हणून खोलीत पडदे आणि बेडवर स्वच्छ चादर अंथरून पूर्ण व्यवस्था करण्यात आली होती. संबंध प्रस्थापित झाल्यानंतर आरोपी महिलेने व्हिडिओतील एक स्क्रीनशॉट तरुणाला पाठवला आणि एक लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली, ज्यामुळे पीडित तरुण प्रचंड मानसिक दडपणाखाली आला होता.

हे वाचलं का?

    follow whatsapp