IPL2026 Match Schedule : कधीपासून सुरू होणार IPL च्या मॅचेस? फक्त 20 मॅचेसचेच शेड्यूल का जाहीर केलं?

मुंबई तक

IPL2026 Match Schedule : बीसीसीआयने आयपीएल 2026 बाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. इंडियन प्रीमियर लीग 2026 च्या पहिल्या टप्प्यातील फक्त 20 मॅचेसचेच शेड्यूल जाहीर करण्यात आलं आहे, यामागील खरं कारण समोर आलं आहे.

ADVERTISEMENT

IPL2026 Match Schedule
IPL2026 Match Schedule
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आयपीएलचे 20 सामने 10 ठिकणी खेळवण्यात येणार

point

आयपीएल 2026 चं आत्ताचं वेळापत्रक

IPL2026 Match Schedule : बीसीसीआयने आयपीएल 2026 बाबत मोठा निर्णय घेतला आहे. इंडियन प्रीमियर लीग 2026 च्या पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. याच काळात देशातील तीन राज्यांची विधानसभा निवडणूक होणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतरच स्पर्धेचे पूर्ण वेळापत्रक जाहीर केले जाईल, अशी माहिती समोर आली आहे. 

हे ही वाचा : सुनेनं सासूच्या तोंडात कोंबला बोळा अन् गुप्तांगात टाकली मिरचीची पूड, नंतर घडलं भलतंच...

20 मॅचेसचेच शेड्यूल का जाहीर केलं?

आयपीएल 2025 मध्ये रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरुचा विजय झाला होता. यंदाच्या आयपीएल 2026 मधील पहिला सामना हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. आयपीएलचे एकूण 20 सामने हे 10 ठिकणी खेळवण्यात येणार आहेत. बेंगळुरू, मुंबई, गुवाहाटी, न्यू चंदीगड, लखनौ, कोलकाता, चेन्नई, दिल्ली, अहमदाबाद आणि हैदराबाद या शहरांमध्ये आयपीएलचे सामने खेळवले जातील. दरम्यान देशातील तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमुळे आयपीएल 2026 चं पूर्ण वेळापत्रक जाहीर न केल्यानं बीसीसीआयने वेळापत्रकाबाबत हा निर्णय घेतला. 

आयपीएल 2026 चं सध्याचं वेळापत्रक

या कालावधीत दुपारचे सामने हे 3.30 वाजता होतील, तसेच संध्याकाळचे सामने हे 7.30 वाजताच्या दरम्यान होणार आहे. शनिवारचा पहिला सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. 

4 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांचा सामना दुपारी अरुण जेटली स्टेडियमवर होती. त्यानंतर गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना होणार आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp