Stuti Sonawane Suicide Case : ताज हॉटेलमध्ये बर्थडे सेलिब्रेशन, आनंदी ठेवलं, पण अचानक फैजुलचा स्वभाव बदलला
Stuti Sonawane Suicide Case : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या सुसाईड नोटमध्ये स्तुतीने त्यांच्या नात्यातील चढ उतारांचे सविस्तर वर्णन केले आहे. फैजुलने तिचा वाढदिवस ताज हॉटेलमध्ये साजरा केला होता आणि सुरुवातीला त्यांचे संबंध अतिशय चांगले होते. मात्र, काही काळानंतर फैजुलच्या वागण्यात अचानक बदल झाला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
Stuti Sonawane Suicide Case : ताज हॉटेलमध्ये बर्थडे सेलिब्रेशन, आनंदी ठेवलं
पण अचानक फैजुलचा स्वभाव बदलला
Stuti Sonawane Suicide Case, मुंबई: मुंबईतील ॲन्टोप हिल परिसरात एका तरुण महिला डॉक्टरने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. डॉ. स्तुती सोनावणे असे मृत तरुणीचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी तिचा प्रियकर फैजुल मोहम्मद खान याला अटक केली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून सहा पानांची सुसाईड नोट जप्त केली असून, त्यामध्ये स्तुतीने आपल्या मृत्यूला फैजुल जबाबदार असल्याचे नमूद केले आहे. आरोपी फैजुल हा इन्सुरन्स एजंट असून त्याने कायद्याचे शिक्षण घेतले आहे. त्यांची ओळख एका मोबाईल अॅपच्या माध्यमातून झाली होती.
सुसाईड नोटमधून धक्कादायक खुलासा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या सुसाईड नोटमध्ये स्तुतीने त्यांच्या नात्यातील चढ उतारांचे सविस्तर वर्णन केले आहे. फैजुलने तिचा वाढदिवस ताज हॉटेलमध्ये साजरा केला होता आणि सुरुवातीला त्यांचे संबंध अतिशय चांगले होते. मात्र, काही काळानंतर फैजुलच्या वागण्यात अचानक बदल झाला. तो तिच्यावर संशय घेऊ लागला आणि वारंवार तिचा अपमान करू लागला. या मानसिक त्रासामुळे आणि अपमानास्पद वागणुकीमुळे स्तुती प्रचंड तणावाखाली होती, ज्यातून तिने राहत्या घरी स्कार्फने गळफास लावून आपले जीवन संपवले.
हेही वाचा : 'मुलाचा वाढदिवस आहे, घरी ये' तरुणाला रुममध्ये नेलं अन्.. महिलेने 'असा' रचला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा सापळा
पालकांनी फोडला दरवाजा आणि सत्य समोर आले
ही घटना 8 मार्चच्या रात्री घडली, जेव्हा स्तुतीचे आई वडील बाहेर जेवायला गेले होते. रात्री उशिरा घरी परतल्यावर तिच्या खोलीचा लाईट चालू असल्याने ती अभ्यास करत असावी असे पालकांना वाटले. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत तिने दरवाजा न उघडल्याने आणि हाकेला प्रतिसाद न दिल्याने पालकांनी दरवाजा तोडला. त्यावेळी त्यांना मुलीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून स्तुतीच्या वडिलांनी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.










