गर्भवती सुनेवर बलात्काराचा प्रयत्न फसला, सासऱ्याने गळा दाबून केली हत्या; नवऱ्यानेच लपवला मृतदेह
Crime News : नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सासऱ्याने आपल्याच सुनेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र यामध्ये अपयश आल्याने तिची गळा दाबून हत्या केली. धक्कादायक म्हणजे, हत्या झालेल्या महिलेच्या नवऱ्याने आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. यामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
गर्भवती सुनेवर बलात्काराचा प्रयत्न फसला
सासऱ्याने गळा दाबून केली हत्या
नवऱ्यानेच लपवला मृतदेह
Crime News : नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सासऱ्याने आपल्याच सुनेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र यामध्ये अपयश आल्याने तिची गळा दाबून हत्या केली. धक्कादायक म्हणजे, हत्या झालेल्या महिलेच्या नवऱ्याने आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. यामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. अभिलाषा कुमारी असं मृत महिलेचं नाव असून बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील ही घटना आहे.
हे ही वाचा : मुंबई : मानखुर्दमध्ये फालुदा विक्रेत्याची चाकूने सपासप वार करुन हत्या, हादरवून टाकणारं सीसीटीव्ही फुटेज समोर
घरी कोणी नसताना साधला डाव
अभिलाषा कुमारीचे लग्न आठ महिन्यांपूर्वी अभिषेक याच्याशी झाले होते. अभिलाषा चार महिन्यांची गर्भवती होती. रविवारी (8 फेब्रुवारी) रात्री जेव्हा घरात कोणी नव्हते, तेव्हा सासरा टुनटुन मेहता याने सुनेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी अभिलाषाने आपल्या चारित्र्यासाठी आणि पोटातील बाळाच्या सुरक्षिततेसाठी जोरदार प्रतिकार केला. या विरोधाने संतप्त झालेल्या सासऱ्याने तिचा गळा घोटून तिला जागीच ठार केले.
पत्नीचा मृतदेह लपवण्यासाठी वडिलांना मदत
जेव्हा पती अभिषेक घरी परतला, तेव्हा त्याला सत्य समजले. मात्र, पत्नीला मृत्यूचं दु:ख त्याला झालंच नाही. उलट त्याने वडिलांचा गुन्हा लपवण्याचा कट रचला. दोघांनी मिळून रात्रीच्या अंधारात अभिलाषाचा मृतदेह एका हातगाडीवर लादला आणि त्यावर कोंबडीच्या खाद्याची पोती रचून तो मृतदेह स्वतःच्या पोल्ट्री फार्ममध्ये लपवून ठेवला. अभिलाषाच्या आईला तिच्याशी संपर्क होत नसल्याने संशय आला आणि त्यांनी नातेवाईकांना तिकडे पाठवले. सुरुवातीला अभिषेकने ती जत्रेला गेल्याची खोटी माहिती देऊन सर्वांना फसवले. मात्र पोलिसांच्या चौकशीत त्याचा बनाव उघड झाला.










