भावजयीने नणंदबाईला संपवले, दगडाने ठेचून केला खून; जमिनीच्या वादातून टोकाचं पाऊल
Crime News : नणंद भावजयीचा वाद हा काही नवीन नाही. दोघींमध्ये सतत कलगीतुरा असल्याचे पहायला मिळते. मात्र एका प्रकरणात हा वाद टोकाल गेला आणि भावजयीने आपल्या 40 वर्षीय नणंदेचा खूनच केला. या कुटुंबात काही काळापासून जमिनीमुळे वाद विवाद सुरु होते. मात्र हा वाद इतक्या टोकाला पोहोचेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. धक्कादायक म्हणजे ही हत्या करण्यात मृत महिलेच्या भाचीचादेखील समावेश होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भावजयीने नणंदबाईला संपवले
दगडाने ठेचून केला खून
जमिनीच्या वादातून टोकाचं पाऊल
Crime News : नणंद भावजयीचा वाद हा काही नवीन नाही. दोघींमध्ये सतत कलगीतुरा असल्याचे पहायला मिळते. मात्र एका प्रकरणात हा वाद टोकाल गेला आणि भावजयीने आपल्या 40 वर्षीय नणंदेचा खूनच केला. या कुटुंबात काही काळापासून जमिनीमुळे वाद विवाद सुरु होते. मात्र हा वाद इतक्या टोकाला पोहोचेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. धक्कादायक म्हणजे ही हत्या करण्यात मृत महिलेच्या भाचीचादेखील समावेश होता. झारखंडच्या साहेबगंज जिल्ह्यातील ही घटना आहे. संझली हांसदा असं मृत महिलेचे नाव आहे.
हे ही वाचा : Hardik Pandya आणि Mahika Sharma विरोधात पुण्यातील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, नेमकं काय घडलं?
दगडाने केला हल्ला
बुधवारी (11 मार्च) सकाळी संझली हांसदा आणि तिची चुलत भावजयी मंझली मुर्मू तसेच पुतणी तारा हांसदा यांच्यात जमिनीवरून कडाक्याचे भांडण झाले. वादाचे स्वरूप इतके गंभीर झाले की, दोन्ही बाजूंनी एकमेकांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की सुरू झाली. याच दरम्यान रागाच्या भरात भावजयी आणि भाची तारा यांनी मिळून संझलीवर दगडाने जोरदार हल्ला केला. या जीवघेण्या हल्ल्यात संझलीचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी हत्येसाठी वापरलेला दगडही जप्त केला आहे.
जमिनीचा जुना वाद
मृत महिलेचा भाऊ मनिंदर हांसदा याने सांगितले की, दोन्ही कुटुंबांमध्ये जमिनीचा वाद जुनाच होता. यापूर्वीही अनेकदा त्यांच्यात हाणामारी झाली होती आणि हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंतही पोहोचले होते. प्रशासकीय स्तरावर जमिनीची मोजणीही करण्यात आली होती, मात्र तरीही हा वाद पूर्णपणे मिटला नव्हता. याच वादाने अखेर एका महिलेचा बळी घेतला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्ट मार्टमसाठी रुग्णालयात पाठवला आहे.










