वहिणी 'नाही' म्हटल्याने सलून चालकाने केले कांड, वहिणीसह चिमुकल्या पुतणींवर फेकले ॲसिड; पोलिसांनाही दिला गुंगारा
Crime News : एका सलून चालकाने माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केले आहे. त्याने आपल्याच कुटुंबातील वहिनी आणि दोन लहानग्या पुतणींवर ॲसिड फेकून त्यांना गंभीर जखमी केले. मंगळवारी (10 मार्च) झालेल्या या हल्ल्यानंतर आरोपी पळ काढण्यात यशस्वी झाला असून, घटनेला 24 तास उलटूनही पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचू शकलेले नाहीत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
वहिणी अन् चिमुकल्या पुतणींवर फेकले ॲसिड
जामीनावर बाहेर आलेल्या सलून चालकाचे कांड
नेमकं काय घडलं?
Crime News : एका सलून चालकाने माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केले आहे. त्याने आपल्याच कुटुंबातील वहिनी आणि दोन लहानग्या पुतणींवर ॲसिड फेकून त्यांना गंभीर जखमी केले. मंगळवारी (10 मार्च) झालेल्या या हल्ल्यानंतर आरोपी पळ काढण्यात यशस्वी झाला असून, घटनेला 24 तास उलटूनही पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. दरम्यान, जखमी महिला आणि दोन्ही मुलींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. अजय असं आरोपीचं नाव असून उत्तर प्रदेशातील मेरठ परिसरातील ही घटना आहे.
हे ही वाचा : बीड : घरातलं काम करत नाही म्हणून आई-वडिल रागावले, एकुलत्या एक मुलाने केली आत्महत्या
11 वर्षांपूर्वी कात्रीने भोसकून केली होती हत्या
आरोपी अजय हा मूळचा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून त्याने 11 वर्षांपूर्वी एका वृद्ध व्यक्तीची कात्रीने वार करून हत्या केली होती. या खुनाच्या प्रकरणात तो सहा महिने तुरुंगात होता आणि नुकताच जामिनावर बाहेर आला होता. गावात तो स्वतःचे सलून चालवतो, मात्र त्याची नजर आपल्या चुलत भावाच्या पत्नीवर होती. याच कारणावरून मंगळवारी अजयचा चुलत भावासोबत जोरदार वाद झाला. यामुळे संतापलेल्या अजयने तिच्यावर ॲसिड फेकण्याचा प्रयत्न केला, मात्र हा हल्ला रोखण्यासाठी मध्ये आलेल्या एका महिलेवर आणि जवळच खेळणाऱ्या दोन लहान मुलींवर त्याने ॲसिड फेकले.
गुऱ्हाळ चालकाकडून मिळवले ॲसिड
पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून, या सलून चालकाने हा हल्ला करण्यासाठी लागणारे ॲसिड एका गुऱ्हाळ चालकाकडून मिळवले होते. ज्यांच्यावर त्याने हल्ला केला, त्या दोन लहान मुली नात्याने त्याच्या पुतण्यात आहेत.दीड आणि दोन वर्ष वयाच्या या लहान मुली आहेत. आरोपीने घरातच हा भीषण हल्ला केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून गुन्ह्यात वापरलेल्या ॲसिडच्या संदर्भात त्या गुऱ्हाळ चालकाचीही चौकशी केली जात आहे.










