क्रिकेट खेळणं बेतलं जीवावर, सामन्यादरम्यान तरुणाची डोक्यात बॅट घालून हत्या, गावात पोलिस बंदोबस्त
Crime News : क्रिकेट हा सर्वांचाच आवडता खेळ आहे. मात्र या खेळामुळे अनेकदा वाद-विवाद होतात. काही वाद इतक्या टोकाला जातात की त्यातून हत्यादेखील झाल्याची अनेक प्रकरणं घडली आहेत. अशीच एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका क्रिकेट सामन्यादरम्यान झालेल्या वादात डोक्यात बॅट घालून एका 18 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

Crime News : क्रिकेट हा सर्वांचाच आवडता खेळ आहे. मात्र या खेळामुळे अनेकदा वाद-विवाद होतात. काही वाद इतक्या टोकाला जातात की त्यातून हत्यादेखील झाल्याची अनेक प्रकरणं घडली आहेत. अशीच एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका क्रिकेट सामन्यादरम्यान झालेल्या वादात डोक्यात बॅट घालून एका 18 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील उन्नाव परिसरातील ही घटना आहे. भूपेंद्र सिंह असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. सामन्यादरम्यान नेमकं काय घडलं, जाणून घेऊया.
हे ही वाचा : भारताचे ऑईल टँकर हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून आणण्यास इराणची परवानगी, एस जयशंकर यांच्या 'फोनाफोनी'ने निघाला मार्ग
सामन्यादरम्यान वाद अन् डोक्यात घातली बॅट
मिळालेल्या माहितीनुसार, सूरजपाल सिंह यांचा मुलगा भूपेंद्र सिंह ३ मार्च रोजी गावातील मुलांसोबत क्रिकेट खेळत होता. खेळ सुरू असतानाच खेळाडूंमध्ये काही कारणावरून जोरदार वाद झाला आणि त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. यावेळी रागाच्या भरात अमित सिंह नावाच्या तरुणाने भूपेंद्रच्या डोक्यावर बॅटने प्रहार केला. या हल्ल्यात भूपेंद्र जागीच कोसळला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. कुटुंबीयांनी त्याला तातडीने जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी लखनऊच्या केजीएमयू रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला.
उपचारादरम्यान मृत्यू
गेल्या दहा दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या भूपेंद्रचा बुधवारी (11 मार्च) रात्री मृत्यू झाला. त्याच्या निधनाची बातमी गावात समजताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. भूपेंद्रच्या मागे आई सावित्री, भाऊ संदीप आणि अर्चना व कुसुमा या दोन बहिणी असा परिवार असून, तरुण मुलाच्या जाण्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी कुटुंबीयांनी आधीच आरोपी अमित सिंह आणि त्याचे आजोबा नन्हेलाल यांच्याविरोधात कलम 308 अन्वये जीवघेणा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला होता.










