सोलापूर : आधी हात जोडले, नंतर खाली बसले, शेवटी इमारतीवरुन उडी; मुलतानी बेकरीच्या मालकाने आयुष्य संपवलं

Solapur Businessman Suicide : सोलापुरातील प्रसिद्ध मुलतानी बेकरीच्या मालकाने गुरुवारी दुपारी 4 च्या सुमारास विजापूर रोडवरील पनास अपार्टमेंटच्या इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली.सुनील मोतीलाल सदारंगानी (वय 59, रा. मूळ सोलापूर, सध्या पुणे) असे त्यांचे नाव आहे. शहरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

Solapur Businessman Suicide

Solapur Businessman Suicide

मुंबई तक

06 Feb 2026 (अपडेटेड: 06 Feb 2026, 12:46 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

आधी हात जोडले, नंतर खाली बसले, शेवटी इमारतीवरुन उडी

point

मुलतानी बेकरीच्या मालकाने आयुष्य संपवलं

Solapur Businessman Suicide : सोलापुरातील प्रसिद्ध मुलतानी बेकरीच्या मालकाने गुरुवारी दुपारी 4 च्या सुमारास विजापूर रोडवरील पनास अपार्टमेंटच्या इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली.सुनील मोतीलाल सदारंगानी (वय 59, रा. मूळ सोलापूर, सध्या पुणे) असे त्यांचे नाव आहे. शहरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

हे वाचलं का?

हे ही वाचा : वनऔषधी शोधताना दरीत कोसळले, कमलगिरी महाराजांचा दुर्दैवी अंत; छत्रपती संभाजीनगर हळहळलं

सुनील हे 17 व्या मजल्यावर संशयितरित्या टेहाळताना दिसल्यानंतर त्यांचा व्हिडीओ काहींनी काढला.याची माहिती पनाश अपार्टमेंटच्या वॉचमनला दिली. ही माहिती तेथील ऑफिसमधील एका दिव्यांग इसमाला कळाल्यानंतर त्यांनी थेट 17 वा मजला गाठला.तेथे जाऊन सुनील यांना विचारपूस करत त्यांना खाली आणले.ते दहाव्या मजल्यावर आणून त्यांच्याजवळ विचारणा करताना सुनील हे त्यांना माझ्या गाडीची चावी हरवली आहे असे म्हणत पुन्हा पळत वरच्या मजल्यावर गेले.काही क्षणानंतर पनाशमधील दुसरा इसम वर गेला, पण तोपर्यंत सुनील यांनी खाली उडी मारली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली.

सदारंगानी काही वर्षांपूर्वी पुणे येथे राहण्यास गेले होते. ते मागील काही दिवसांपासून तणावात होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या घटनेची वार्ता विजापूर नाका पोलिसांना कळताच तेथील वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादा गायकवाड, पोलिस निरीक्षक सुशांत वराळे, विलास घुगे हे घटनास्थळी गेले. तेव्हा ते रक्ताच्या थारोळ्यात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळले. त्यानंतर विजापूर नाका पोलिसांनी रुग्णवाहिकेतून त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांच्या गाडीच्या नंबरप्लेटवरून पोलिसांना त्यांची ओळख पटली.

हे ही वाचा : शुक्र ग्रहाने नक्षत्र बदललं; आता 'या' राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरू... कारकिर्दीत लक्षणीय प्रगती

पोलिसांनी माहिती घेऊन सदारंगानी यांच्या नातेवाइकांशी संपर्क साधला. माहिती कळताच त्यांच्या नातेवाइकांनी शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती. सदारंगानी हे पुण्याहून सोलापुरात कधी आले होते, याबाबतची माहिती पोलिसांकडून घेण्याचे काम सुरू आहे.तसेच त्यांनी आत्महत्या का केली? याचाही शोध केला जात आहे. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.

    follow whatsapp