जालना : वडिलांच्या मित्राकडून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 'नको तेच', चार महिन्यांपूर्वी..

मुंबई तक

10 Jun 2026 (अपडेटेड: 10 Jun 2026, 02:11 PM)

Jalna crime : जालना जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. परतूर तालुक्यात वडिलांच्या मित्राने एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या लज्जास्पद घटनेनं परिसर हादरून गेला आहे.

crime news

crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

चार महिन्यांपूर्वी पीडितेवर जबरदस्ती लैंगिक संबंध ठेवले

point

पीडिता चार महिन्यांची गर्भवती राहिली

Jalna Crime : गौरव साळी - जालना जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. परतूर तालुक्यात वडिलांच्या मित्राने एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या लज्जास्पद घटनेनं परिसर हादरून गेला आहे. पोलिसांनी संशयित आरोपी नवनाथ सोपान आयंदेविरूद्ध गुन्हा दाखल केला. नराधमाने पीडितेला गर्भवती ठेवल्याची माहिती समोर आली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Astrology : 'या' तारखेपासून त्रिग्रही योगाची निर्मिती, सूर्य, बुध आणि चंद्राच्या प्रभावामुळे काही राशींचे भाग्य उजळणार

चार महिन्यांपूर्वी पीडितेवर जबरदस्ती लैंगिक संबंध ठेवले

पोलिसांच्या माहितीनुसार,  पीडित मुलीने बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते, ती आपल्या पालकांना शेतीच्या कामात मदत करत होती. संशयित आरोपी नवनाथ आयंदे हा पीडित मुलीच्या वडिलांचा मित्र होता. तो सतत त्यांच्या घरी ये-जा करायचा. चार महिन्यांपूर्वी पीडित मुलगी शेतात काम करताना नराधमाने शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केली. तिने नकार दिल्यानंतर आरोपीने जबरदस्ती केल्याचा आरोप पीडितेनं तक्रारीत नमूद केला आहे. 

पीडिता चार महिन्यांची गर्भवती राहिली

आरोपी इथवरंच न थांबता त्याने वारंवार भीती दाखवून तिच्याशी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. काही दिवसांपासून पीडितेला उलट्या आणि पोट दुखू लागलं. त्यानंतर पालकांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात पीडितेवर सोनोग्राफी करण्यात आली असता, ती पीडित मुलगी चार महिन्यांची गर्भवती राहिली होती. पालकांनी पीडितेची विचारपूस केली असता, तिने आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती दिली. 

हे ही वाचा : आकांक्षाने प्रेमविवाह केला, कुटुंबियांनी एकत्र होऊन सूड उगवला!

संबंधित प्रकरणी 7 जून रोजी माजलगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. नंतर हाच गुन्हा शून्य क्रमांकाने आष्टी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेनं परिसरातील नागरिकांनी संपात व्यक्त केला आहे.