Maharashtra Weather : पावसाचा लपंडाव, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई तक

• 05:00 AM • 01 Nov 2026

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर महिन्यात उन्हाच्या झळा लागत होत्या. बहुतांश ठिकाणी अधिककरून कोकणात उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता वर्तविण्यात येत होती. राज्यातील काही भागांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Maharashtra Weather (AI Photo)

Maharashtra Weather

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

राज्यात ऑक्टोबर महिन्यात उन्हाच्या झळा लागत होत्या

point

काही भागांत पावसाची शक्यता

point

जाणून घ्या एकूण हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर महिन्यात उन्हाच्या झळा लागत होत्या. बहुतांश ठिकाणी अधिककरून कोकणात उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता वर्तविण्यात येत होती. राज्यातील काही भागांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने 1 नोव्हेंबरसाठी वर्तवलेल्या जिल्हानिहाय अंदाजानुसार, कोकणात बहुतांश जिल्ह्यांत हवामान कोरडे राहणार असल्याची शक्यता आहे. अशातच जाणून घ्या एकूण हवामानाचा अंदाज. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : '..म्हणून संजय राऊत बाळासाहेबांना आवडत नव्हते', राज ठाकरेंनी सांगितला 'तो' किस्सा

कोकण

कोकण विभागात पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडमध्ये हवामान कोरडे असण्याची शक्यता आहे. या भागांतील नागरिकांना पावसापासून काहीअंशी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात हलक्या पावसाच्या सरी कोसळणार आहेत, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळतील. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यांत मेघगर्जनेसह सरी पडण्याची अधिकची शक्यता आहे. पुणे घाटमाथा परिसरातही पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला. कोल्हापूर जिल्हा आणि घाटमाथा परिसरात मेघर्जनेसह सरी पडू शकतात. सातारा आणि सांगली जिल्ह्यांतही पावसाची शक्यता कायम आहे. सोलापूर जिल्ह्यात मात्र हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. 

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. नाशिक, नाशिक घाटमाथा परिसर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत रोजी हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे, यामुळे वातावरण थोडसं थंड राहण्याची शक्यता आहे. 

मराठवाडा 

मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि हिंगोली जिल्ह्यांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मात्र, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत मेघगर्जनेसह सरी कोसळण्याचा अंदाज आहे, तर नांदेडमध्ये हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा : सांगली: मतिमंद मुलीवर घरात घुसून लैंगिक अत्याचार, बाप-लेकाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

विदर्भ 

विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा आणि वाशिम जिल्ह्यांना कोणताही इशारा दिलेला नाही. मात्र, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांना मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविलेला आहे.