Govt Jobs : रेल्वेमध्ये TC बनण्याची सुवर्णसंधी, काय आहेत पात्रतेचे निकष? जाणून घ्या सविस्तर

मुंबई तक

30 Oct 2026 (अपडेटेड: 30 Oct 2026, 04:08 PM)

रेल्वे भरती बोर्डाद्वारे विविध पदांसाठी भरती सुरु करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 13 नोव्हेंबर 2026 आहे.

RRB Recruitment 2026

RRB Recruitment 2026

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

रेल्वेमध्ये विविध पदांची भरती

point

काय आहेत पात्रतेचे निकष?

point

पगार किती मिळणार?

RRB Recruitment 2026 : रेल्वे भरती बोर्डातर्फे (RRB) एनटीपीसी अंतर्गत विविध पदांच्या भरतीची घोषणा करण्यात आली आहे. याअंतर्गत एकूण 1688 रिक्त जागांसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीद्वारे तिकीट लिपिक (Commercial cum Ticket Clerk), लेखा लिपिक सह टंकलेखक (Accounts Clerk cum Typist), कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक (Junior Clerk cum Typist) आणि ट्रेन्स लिपिक (Trains Clerk) अशा एकूण चार श्रेणींमधील पदे भरली जाणार आहेत. यात सर्वाधिक 700 जागा तिकीट लिपिकाच्या (TC) असून, कनिष्ठ लिपिकाच्या 600, लेखा लिपिकाच्या 200 आणि ट्रेन्स लिपिकाच्या 188 जागांचा समावेश आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.

हे वाचलं का?

पात्रतेचे निकष काय?

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी किमान 50 टक्क्यांच्या एकूण गुणांसह  बारावी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या शैक्षणिक अर्हतेच्या आधारे पात्र ठरणाऱ्या तरुणांना रेल्वे विभागात सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. सदर भरती प्रक्रियेसाठी 15 ऑक्टोबर पासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 नोव्हेंबर 2026 आहे.

हे ही वाचा : अजित पवार यांच्या NCP मधील इनसाईड स्टोरी, नेमकं काय घडतंय?

अर्ज कसा करावा?

अर्ज शुल्काबाबत बोलायचे तर, सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी 500 रुपये शुल्क आकारले जाईल, तर एससी, एसटी, माजी सैनिक, दिव्यांग, महिला, ट्रान्सजेंडर, अल्पसंख्याक आणि आर्थिक मागास वर्ग (EBC) यांसारख्या पात्र उमेदवारांसाठी सवलतीचे 250 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करणे आवश्यक आहे.

हे ही वाचा : कराळे मास्तर, रविराज साबळेंनी प्रस्थापितांची गणितं कशी बिघडवली?

पगार किती मिळणार?

निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या (7th CPC) नियमांनुसार वेतन मिळणार असून, त्यात लेव्हल 2 आणि लेव्हल 3 चा समावेश आहे. तिकीट लिपिक पदासाठी लेव्हल 3 नुसार 21,700 रुपये मूळ वेतन दिले जाईल, तर उर्वरित तीन पदांसाठी लेव्हल 2 नुसार 19,900 रुपये मूळ वेतन निश्चित करण्यात आले आहे. या भरती संबंधी अधिक माहिती व तपशीलासाठी उमेदवारांनी rrb.indianrailways.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.