Govt Jobs : भारत सरकारच्या कंपनीत ड्रायव्हरसह विविध पदांसाठी भरती, महिन्याला 70 हजार रुपयांपर्यंत पगार

मुंबई तक

• 03:20 PM • 01 Nov 2026

संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील कंपनीत विविध पदांसाठी भरती सुरु झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 28 नोव्हेंबर आहे.

GRSE Recruitment 2026

GRSE Recruitment 2026

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील कंपनीत भरती

point

दहावी पास अनुभवी चालकांना मोठी संधी

GRSE Recruitment 2026 : संरक्षण मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत येणाऱ्या गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स लिमिटेड (GRSE), कोलकाता (पश्चिम बंगाल) येथे जर्नीमन आणि ड्रायव्हर (व्हिएकल) पदांसाठी भरती सुरु आहे. या भरती अंतर्गत एकूण ५८ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये 55 जागा तर ड्रायव्हर (व्हिएकल) पदासाठी 3 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 नोव्हेंबर 2026 आहे.

हे वाचलं का?

काय आहेत पात्रतेचे निकष?

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदांनुसार निश्चित करण्यात आली आहे. उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून, जर्नीमन पदासाठी संबंधित ट्रेडमध्ये NAC (नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट) किंवा NTC (नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट) प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. ड्रायव्हर पदासाठी विहित वाहन चालक परवाना (Driving Licence) आणि संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे. वयोमर्यादेचा विचार करता, 1 ऑक्टोबर 2026 रोजी जर्नीमन पदासाठी कमाल वय 26 वर्षे आणि ड्रायव्हर पदासाठी कमाल वय 32 वर्षे निश्चित करण्यात आले आहे (शासकीय नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादतेत सूट लागू असेल).

हे ही वाचा : बायकोचे दोघांसोबत अनैतिक संबंध, विरोध करणं नवऱ्याला पडलं महागात, तलावात आढळला मृतदेह

पगार किती मिळणार?

निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन आणि विद्यावेतन दिले जाणार आहे. जर्नीमन पदावरील उमेदवारांना दरमहा 24,000 रुपये ते 26,000 रुपये प्रतिमहिना विद्यावेतन (Stipend) मिळेल, तर ड्रायव्हर पदासाठी 20,110 रुपये ते 70,390 रुपये या वेतनश्रेणीनुसार (Pay Scale) पगार दिला जाईल. उमेदवारांची निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षा (Written Test), प्रॅक्टिकल ट्रेड टेस्ट (Practical Trade Test), आवश्यकतेनुसार शारीरिक चाचणी (Applicable PET), कागदपत्र पडताळणी (Document Verification) आणि वैद्यकीय तपासणी (Medical Examination) याद्वारे पूर्ण केली जाईल.

हे ही वाचा : सत्ता, संपत्ती अन् 40 व्हिला! IAS-IPS दाम्पत्य ACB च्या रडारवर, नक्की प्रकरण काय?

'असा' करा अर्ज

नोकरीचे मूळ ठिकाण कोलकाता (पश्चिम बंगाल) असून सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी आपला अर्ज सबमिट करावा. या भरतीसंबंधी अधिक माहिती, सविस्तर पात्रता आणि ऑनलाइन अर्जासाठी GRSE च्या अधिकृत संकेतस्थळाला www.grse.in भेट द्यावी.