Mumbai News : मुंबईतील प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने विविध ठोस उपाययोजना हाती घेतल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून 28 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर 2026 या कालावधीत शहरात रस्ते स्वच्छता आणि धूळ नियंत्रणासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. बांधकाम व पाडकामातून निर्माण होणाऱ्या राडारोड्यामुळे (C&D Waste) होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने सर्व संबंधित घटकांना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे कडक आवाहन केले आहे.
ADVERTISEMENT
'या' घटकांसाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य
प्रदूषण नियंत्रणाला गती देण्यासाठी पालिकेने बांधकाम क्षेत्राशी निगडित सर्व घटकांसाठी ऑनलाइन नोंदणी अनिवार्य केली आहे. यामध्ये सर्व प्रकल्प व बांधकाम व्यावसायिक, राडारोडा निर्माण करणारे, प्रक्रिया व पुनर्वापर करणारे (Recyclers), वाहतूकदार आणि वाहतूक करणारी वाहने तसेच अनलोडिंग साईट्सचा समावेश आहे. याशिवाय, उत्खननातून निघणारा राडारोडा हा सामान्य बांधकाम कचऱ्यापासून वेगळा ठेवून त्याची स्वतंत्रपणे वाहतूक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रस्त्यावर धूळ पसरू नये यासाठी राडारोडा वाहून नेणारी वाहने पूर्णपणे झाकलेली असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
हे ही वाचा : पैसा-पाणी : खरंच देशातील बँका काँग्रेसने उभारल्या?
उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
राडारोड्याची वाहतूक आणि विल्हेवाट यावर बारीक लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक वाहनामध्ये पालिकेने नियुक्त केलेल्या सेवा प्रदात्याची कार्यरत 'वाहन मागोवा प्रणाली' (VTMS) बसवणे अनिवार्य आहे. कचऱ्याची विल्हेवाट ही केवळ पालिकेने अधिकृत केलेल्या ठरवून दिलेल्या स्थळांवरच करणे बंधनकारक राहील. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई केली जाणार असून, यामध्ये अनधिकृतपणे कचरा टाकल्यास प्रतिवाहन 20,000 रुपये, मंजुरीशिवाय वाहतूक केल्यास 25,000 रुपये आणि VTMS नियमांचे उल्लंघन केल्यास प्रति उल्लंघन 25,000 रुपये दंड आकारला जाईल.
हे ही वाचा : Govt Jobs : भारत सरकारच्या कंपनीत ड्रायव्हरसह विविध पदांसाठी भरती, महिन्याला 70 हजार रुपयांपर्यंत पगार
हवेची गुणवत्ता राखण्यास प्राधान्य
बृहन्मुंबई महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे की, शहरातील रस्त्यांवरील धूळ आणि बांधकामामुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी हे नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत. नागरिकांचे आरोग्य जपणे आणि वातावरणातील वायू गुणवत्ता राखणे हे प्राधान्य असून सर्व बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदार आणि वाहतूकदारांनी या मोहिमेत सहकार्य करून नियमांचे पालन करावे, अन्यथा कोणत्याही शिथिलतेशिवाय कारवाई केली जाईल.
ADVERTISEMENT












