Palghar crime : पालघर शहरातील भरवाड पाडा परिसरात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेनं जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची वस्तुस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे. सर्पदंशामुळे एका 3 वर्षीय चिमुकला आतिफ आशिक खानचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना केवळ एका मृत्यूपुरती मर्यादित नसून वर्षानुवर्षे रखडलेल्या प्रकल्पावर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : बीड: 'कार्यक्रम ओक्के', बायकोनं प्रियकराच्या मदतीने नवऱ्याची केली हत्या, पुढे..
आतिफच्या पायाला सर्पदंश
आतिफ हा आपल्या घरापासून काही अंतरावर इतर मुलांसोबत खेळत होता. त्याचदरम्यान तो रडत रडत घरी आला होता. त्याने आईला पायाला काहीतरी चावल्याची माहिती दिली. आईने मुलाचा पाय पाहिला असता, त्याचा दोन ठिकाणी जखमा झाल्याचे आढळून आले होते. आतिफला तात्काळपणे पालघर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
45 मिनिटांतच चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
काही मिनिटांतच त्याची प्रकृती अधिक ढासळू लागली होती. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच, त्याला पुढील उपचारांसाठी पालघर येथील धवले रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. माहितीनुसार, सर्पदंशानंतर अवघ्या 45 मिनिटांतच चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. नागरिकांनी संताप व्यक्त करत प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचं म्हणणं असं की, पालघरमधील जिल्हा रुग्णालय आणि ट्रॉमा सेंटरचा प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडलेला होता. अपत्कालीन परिस्थितीत कोणाताही बदल झालेला दिसून आला नाही.
हे ही वाचा : बीड: अधिक मासात जावयाला आणलेली अंगठी मांजरीने गिळली, पुढं काय घडलं?
दरम्यान, आतिफच्या मृत्यूनंतर हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. आरोग्य सुविधांच्या अभावामुळे आणखी भविष्यात किती नागरिकांना जीव घेतला जाईल असा प्रश्न उपस्थित होतो.
ADVERTISEMENT











