पार्थ पवारांचं लग्न होणार 'या' दिवशी, तारीख जाहीर होताच पार्थ-कायनातचे Exclusive फोटोही आले समोर

ओमकार वाबळे

• 11:54 PM • 23 Jul 2026

Parth Pawar Wedding: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी खासदार पार्थ अजित पवार यांच्या साखरपुडा आणि विवाहाची तारीख जाहीर केली आहे. बारामतीत हा विवाह सोहळा पार पडणार आहे.

ncp leader and mp parth pawar engagement on 29 july wedding to take place in baramati on 27 february 2027 shankaracharya clears up a major misunderstanding regarding wedding

पार्थ पवार आणि कायनात दारा

Google CTA

कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी गुरुवारी (23 जुलै) खासदार पार्थ अजित पवार यांच्या साखरपुडा आणि विवाहाची तारीखच जाहीर करून टाकली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्थ पवार यांचा साखरपुडा 29 जुलै 2026 रोजी साध्या कौटुंबिक समारंभात होणार असून, 27 फेब्रुवारी 2027 रोजी बारामती येथे विवाहसोहळा पार पडणार आहे.

हे वाचलं का?

यासोबतच पालकांच्या निधनानंतर विवाह कधी करावा, याबाबत समाजात प्रचलित असलेल्या समजुतीवरही करवीर पीठाचे शंकराचार्य यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे.

शंकराचार्यांनी लग्नाविषयी नेमकं काय सांगितलं?

उमेश पाटील यांनी सांगितले की, समाजात अशी धारणा आहे की आई किंवा वडिलांचे निधन झाल्यास कुटुंबातील विवाह एका वर्षाच्या आत करावा लागतो. अन्यथा पुढील तीन वर्षे विवाह करता येत नाही.

हे ही वाचा>> पार्थ पवारांची होणारी पत्नी कायनात दाराचं करिअर चर्चेत, कारकीर्द पाहून व्हाल थक्क!

याबाबतची धार्मिक वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी त्यांनी करवीर पीठाचे शंकराचार्य यांची भेट घेतली. छत्रपती शाहू महाराज आणि करवीर शंकराचार्य पीठ यांचा ऐतिहासिक संबंध लक्षात घेऊन धर्मशास्त्रातील परंपरा आणि विधी याबाबत मार्गदर्शन घेण्यात आले.

'एका वर्षातच विवाह करावा' असा कोणताही धार्मिक नियम नाही

उमेश पाटील यांच्या म्हणण्यानुसार, शंकराचार्यांनी स्पष्ट केले की, पालकांच्या निधनानंतर धर्मशास्त्रानुसार सर्व धार्मिक विधी आणि कर्मकांड पूर्ण करणे आवश्यक आहे. मात्र, विवाह एका वर्षाच्या आतच करावा, असा कोणताही धार्मिक नियम किंवा बंधन धर्मशास्त्रात नाही. त्यामुळे या विषयावर समाजात पसरलेल्या गैरसमजांना बळी पडण्याचे कारण नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा>> पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा, रोहित पवारांनी पत्रिका केली शेअर, कोण आहेत कायनात धार?

29 जुलैला साखरपुडा, फेब्रुवारी 2027 मध्ये विवाह

उमेश पाटील यांनी सांगितले की, 29 जुलै 2026 रोजी पार्थ पवार यांचा साखरपुडा केवळ कुटुंबीय आणि निमंत्रितांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने पार पडणार आहे. त्यानंतर 27 फेब्रुवारी 2027 रोजी बारामती येथे विवाहसोहळा आयोजित करण्यात आला आहे.

कोण आहेत पार्थ पवार यांची होणारी पत्नी?

उमेश पाटील यांनी पार्थ पवार यांच्या होणाऱ्या पत्नीबाबतही माहिती दिली. त्यांचे नाव कायनात दारा (Kaiynaat Dara) असून त्या मूळच्या चंदीगड येथील आहेत. सध्या त्या दिल्लीत वास्तव्यास आहेत.

उमेश पाटील यांनी सांगितले की, अलीकडील काही माध्यमांनी पार्थ पवार यांच्या होणाऱ्या पत्नीचे नाव आणि जन्मस्थानाबाबत चुकीची माहिती प्रसिद्ध केली होती. त्यामुळे कोणताही संभ्रम राहू नये म्हणून योग्य माहिती अधिकृतपणे जाहीर करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या घोषणेमुळे पार्थ पवार यांच्या विवाहाची तारीख, साखरपुड्याचा कार्यक्रम आणि धार्मिक परंपरांबाबतचे अनेक गैरसमज दूर झाले आहेत.

जाणून घ्या कायनात दाराविषयी सविस्तर

अधिकृत नाव

Ms. Kaiynaat Dara (कायनात दारा)

स्पेलिंग: Kaiynaat Dara

कौटुंबिक व सामाजिक पार्श्वभूमी

  • धर्म: Punjabi Hindu
  • समाज: Kshatriya
  • गोत्र: Kashyap

शालेय शिक्षण

  • The British School, Chanakyapuri, New Delhi

भारतातील राजधानी दिल्लीतील अत्यंत प्रतिष्ठित आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षणसंस्थांपैकी ही एक संस्था मानली जाते.

उच्च शिक्षण

The London School of Economics and Political Science (LSE), London

  • Bachelor of Science (B.Sc.)
  • International Relations
  • First Class Honours

LSE ही सामाजिक शास्त्रे, आंतरराष्ट्रीय संबंध, अर्थशास्त्र आणि सार्वजनिक धोरण या क्षेत्रांतील जगातील अग्रगण्य विद्यापीठांपैकी एक मानली जाते.

व्यावसायिक अनुभव

उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी भारतातील अग्रगण्य इंग्रजी वृत्तवाहिन्यांपैकी एक असलेल्या NDTV 24x7 मध्ये:

  • Output Editor
  • Reporter

म्हणून कार्य केले.

सध्याचे कार्य

सध्या त्या आपल्या कुटुंबाच्या खालील व्यवसायामध्ये कार्यरत आहेत:

  • Hospitality
  • Real Estate

सार्वजनिक जीवनातील भूमिका

खासदार श्री. पार्थ अजित पवार यांच्या जीवनसाथी व उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांच्या सून म्हणून त्या सार्वजनिक जीवनात प्रवेश करीत आहेत.

शिक्षण, जागतिक दृष्टिकोन, व्यावसायिक अनुभव, सार्वजनिक व्यवहारांची जाण आणि भारतीय सांस्कृतिक मूल्यांचा आदर या सर्वांचा समतोल त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येतो.

त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे सार्वजनिक जीवन, सामाजिक कार्य आणि राष्ट्रनिर्माणाच्या विविध उपक्रमांमध्ये सकारात्मक योगदान मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे.