वॉशिंग्टन: वयाच्या 26 व्या वर्षी कोणी एका दिवसात 77 कोटी रुपये कमवू शकते का? हे एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखे वाटते, पण IIT कानपूरचा पदवीधर असलेल्या सिद्धार्थ सक्सेनाने हा दावा केला आहे. आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर (AI)आधारित स्टार्टअप्स चर्चेत आहे.
ADVERTISEMENT
अलीकडील एका मुलाखतीनंतर, त्याची कहाणी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. त्याने खुलासा केला आहे की, त्याने एका दिवसात अंदाजे 8 मिलियन रुपये, म्हणजेच अंदाजे 77 कोटी रुपये कमावले आहेत.
नेमकं कोणतं टूल बनवलं की, ज्यामुळे मिळाले 77 कोटी?
सिद्धार्थ सक्सेनाने IIT कानपूरमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये B.Tech केले आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्याने मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये काम केले.
हे ही वाचा>> Govt Jobs : इस्रोमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी, काय आहेत निकष? जाणून घ्या सविस्तर
नंतर, त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांसोबत 'मर्लिन' (Merlin) नावाचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्टार्टअप सुरू केला. हे एक AI-आधारित गुगल क्रोम एक्सटेंशन आहे, जे ईमेल लिहिणे, वेब पेजेसचा सारांश तयार करणे, कंटेंट तयार करणे आणि इतर अनेक कामांमध्ये मदत करते.
Merlin एक्सटेंशन अनेक समस्या सोडवते. ते क्रोम किंवा एज सारख्या सामान्य ब्राउझर्सनादेखील एजेंटिव्ह ब्राउझर्समध्ये रूपांतरित करते. क्रोम वापरून, तुम्ही थेट Merlin मधून पेजच्या कंटेंटचा सारांश आणि त्यावर संशोधन करू शकता.
या एक्सटेंशनचा फायदा हा आहे की, जनरेटिव्ह AI वापरण्यासाठी तुम्हाला वारंवार दुसऱ्या टॅबवर किंवा वेबसाइटवर जाण्याची गरज नाही. तुम्हाला AI ची फिचर्स थेट पेजवरच मिळतील. जर तुम्ही परप्लेक्सिटीचा (Perplexity) कॉमेट ब्राउझर वापरला असेल, तर तुम्हाला तिथेही असेच एक फीचर आढळेल.
एका मुलाखतीत, सिद्धार्थने त्याच्या सर्वाधिक वार्षिक कमाईचा खुलासा केला. त्याने सांगितले की त्याने एका दिवसात 8 दशलक्ष डॉलर्स कमावले. त्याच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली. पण, त्याला हे पैसे कोणत्या डील किंवा व्यवहारातून मिळाले याचा संपूर्ण तपशील त्याने सार्वजनिक केलेला नाही.
हे ही वाचा>> वडील फुटपाथवर बॅग विकतात, मुलाचं NEET परीक्षेत यश; ओमची ह्रदयस्पर्शी कहाणी
Merlin 2022 मध्ये सुरू करण्यात आलं होतं. सिद्धार्थने त्याचे IIT कानपूरमधील मित्र प्रत्युष राय आणि सिरसेंदू सरकार यांच्यासोबत याची स्थापना केली. कंपनीची झपाट्याने वाढ झाली आणि अहवालानुसार, तिचे मूल्यांकन अंदाजे 50 दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहोचले आहे. सिद्धार्थ हा 'Thine' नावाच्या दुसऱ्या AI स्टार्टअपचा सह-संस्थापक देखील आहे.
सिद्धार्थ म्हणतो की, भारतातील बहुतेक लोक मर्यादित संसाधनांसह मोठे होतात, त्यामुळे ते जोखीम पत्करणे टाळतात. त्याचा विश्वास आहे की, एक यशस्वी कंपनी उभारण्यासाठी चौकटीबाहेरचा विचार आणि मोठी ध्येये आवश्यक असतात.
सिद्धार्थने असेही सांगितले की, अमेरिकेत अनेक लोक केवळ त्यांच्या आवडीमुळे कंपन्या सुरू करतात, तर भारतात लोक अनेकदा नाइलाजाने करिअर निवडतात.
मुलाखतीदरम्यान, सिद्धार्थने IIT कानपूरबद्दल एक मोठा दावाही केला. तो म्हणाला की, IIT कानपूरच्या कॉम्प्युटर सायन्स प्रोग्राममध्ये प्रवेश मिळवणे हे हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश मिळवण्यापेक्षा सुमारे 20 पट अधिक कठीण आहे.
ADVERTISEMENT












