Maharashtra Weather : राज्यातील वातावरण फिरलं, 'या' जिल्ह्यांत वरुणराजाचं रौद्ररूप

मुंबई तक

• 05:00 AM • 19 Jul 2026

maharashtra weather : राज्यात काही दिवसांपासून पावसाची म्हणावी अशी अपेक्षित हजेरी लागलेली दिसून आली नाही, 18 जुलै रोजी सायंकाळी मुंबईसह रायगडमध्ये काही प्रमाणात पावसाने हजेरी लावली होती. मात्र, इतर जिल्ह्यांत अपेक्षित मान्सून नसल्याची माहिती आहे. अशातच 19 जुलै 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज जाणून घ्या.  

Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update

Google CTA

बातम्या हायलाइट

point

राज्यात मान्सूनची स्थिती कशी?

point

19 जुलै 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Weather : राज्यात काही दिवसांपासून मान्सून गायब झाल्याचं चित्र आहे. काही जिल्ह्यांत ढगाळ वातावरण दिसतं, मात्र पावसाची म्हणावी अशी अपेक्षित हजेरी लागलेली दिसून आली नाही, 18 जुलै रोजी सायंकाळी मुंबईसह रायगडमध्ये काही प्रमाणात पावसाने हजेरी लावली होती. मात्र, इतर जिल्ह्यांत अपेक्षित मान्सून नसल्याची माहिती आहे. अशातच 19 जुलै 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज जाणून घ्या.  

हे वाचलं का?

हे ही वाचा : रामरक्षा येते का? CM फडणवीसांचा प्रश्न, उद्धव ठाकरेंचं खरमरीत उत्तर म्हणाले...

कोकण 

कोकण मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांत मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, तर पालघरमध्ये हलक्या पावसासह विजांचा कडकडाट जाणवण्याची शक्यता आहे. 

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत हलक्या पावसासह वादळाची शक्यता आहे. जळगाव, नाशिक जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस तसेच विजांचा कडकडाट जाणवण्याची शक्यता आहे. नाशिक घाटमाथा परिसरात हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. अहिल्यानगरमध्ये पावसाचा यलो अलर्ट वर्तवण्यात आलेला आहे. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रात पुणे, पुणे घाटमाथा येथे पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे. कोल्हापूर घाटमाथा परिसरात हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांत हलका ते मध्यम पावसासह विजांच्या कडकडाटाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. सातारा घाटमाथा परिसरात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. 

मराठवाडा 

मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांत  हलका ते मध्यम पावसासह विजांच्या कडकडाटाचा अंदाज आहे. हिंगोली, बीज, परभणी या जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्टची शक्यता आहे. 

हे ही वाचा : सोनम वांगचुक यांना उचललं, अभिजीत दिपकेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

विदर्भ 

विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, नागपूर आणि वाशिम या सर्वच जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.