Govt Jobs : भारतीय स्टेट बँकेत नोकरीची संधी, 90 हजार रुपयांपर्यंत पगार

मुंबई तक

• 04:21 PM • 20 Sep 2026

भारतीय स्टेट बँकेत (SBI) नोकरीची सुवर्णसंधी आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 28 सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे. अर्ज कसा करावा? जाणून घ्या सविस्तर.

SBI Recruitment

SBI Recruitment

Google CTA

बातम्या हायलाइट

point

भारतीय स्टेट बँकेत नोकरीची संधी

point

90 हजार रुपयांपर्यंत पगार

SBI Recruitment : भारतीय स्टेट बँकेत (SBI) नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. ट्रेड फायनान्स ऑफिसर या पदांच्या भरतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. याअंतर्गत एकूण 35 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत, ज्यामध्ये 14 जागा एका श्रेणीसाठी तर 21 जागा दुसऱ्या श्रेणीसाठी आहेत. संपूर्ण भारतात नोकरी करण्याची तयारी असलेल्या पात्र उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी असून, या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

पात्रतेचे निकष काय?

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाचे निकष बँकेने स्पष्ट केले आहेत. उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण केलेली असावी आणि त्यासोबतच 'IIBF' कडून फॉरेक्स ऑपरेशन्स (Forex Operations) मधील प्रमाणपत्र मिळवलेले असणे अनिवार्य आहे. अनुभवाच्या बाबतीत, काही पदांसाठी किमान 1 वर्षाचा, तर काही पदांसाठी किमान ३ वर्षांचा संबंधित क्षेत्रातील कामाचा पूर्वअनुभव असणे आवश्यक आहे.

हे ही वाचा : सतीश सालीयान मातोश्रीच्या बाहेर, ठाकरेंना नोटीस देत काय बोलून गेले?

'असा' करा अर्ज

उमेदवारांची वयोमर्यादा 31 जुलै 2026 रोजी ग्राह्य धरली जाणार आहे. 21 ते 32 वर्षे वय असणे गरजेचे आहे. नियमांनुसार अनुसूचित जाती आणि जमातीतील (SC/ST) उमेदवारांना वयात 5 वर्षांची, तर इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना 3 वर्षांची सूट राहील. अर्ज करण्यासाठी खुला प्रवर्ग, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी उमेदवारांना 750 रुपये फी भरावी लागेल, तर एससी, एसटी आणि दिव्यांग (PWD) उमेदवारांना या शुल्कातून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे.

हे ही वाचा : मुंबईची खबर : लोकलच्या पाससाठी UPI वापरताय? आता मोजावे लागणार अतिरिक्त शुल्क

वेतन किती मिळणार?

निवड झालेल्या उमेदवारांना ज्युनियर मॅनेजमेंट ग्रेड स्केल 1 (JMGS-I) आणि मिडल मॅनेजमेंट ग्रेड स्केल 2 नुसार 48,480 ते 93,960 रुपयांपर्यंतची आकर्षक वेतनश्रेणी दिली जाईल. या पदासाठी सुरुवातीला 6 महिन्यांचा प्रोबेशन कालावधी असेल आणि त्यानंतर महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA), पीएफ (PF), पेन्शन फंड (NPS) आणि वैद्यकीय सुविधांसारखे विविध भत्ते नियमानुसार मिळतील. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी बँकेच्या 'sbi.bank.in' या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन आपला ऑनलाइन अर्ज लवकरात लवकर पूर्ण करावा.