Government Jobs : खादी व ग्रामोद्योग महामंडळ (KVIC) मुंबई येथे विविध 50 पदांच्या भरतीसाठी अधिकृत प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीअंतर्गत अॅडव्हायझर, सिनियर कन्सल्टंट्स आणि यंग प्रोफेशनल्स या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. मुंबई हे या नोकरीचे मुख्य ठिकाण असणार असून, खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्राला बळकटी देण्यासाठी व प्रशासकीय कामकाज अधिक कार्यक्षम करण्यासाठी ही पदे भरली जात आहेत.
ADVERTISEMENT
शैक्षणिक पात्रता काय?
या भरती प्रक्रियेत विविध पदांनुसार शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाची अट निश्चित करण्यात आली आहे. अॅडव्हायझर पदासाठी शासकीय विभाग किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमधून (PSUs) किमान 15 वर्षांचा अनुभव असलेले निवृत्त किंवा स्वेच्छानिवृत्ती घेतलेले कर्मचारी पात्र असतील. सिनियर कन्सल्टंट्स पदासाठी संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा व्यवस्थापन क्षेत्रातील पदवीसह 5 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. तर यंग प्रोफेशनल्स पदासाठी M.Com, MBA (Finance), CA, ICWA किंवा संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी/इंजिनिअरिंग पदवी आणि 5 वर्षांचा अनुभव असणे बंधनकारक आहे.
हे ही वाचा : ‘गोंधळ’ची अकादमी पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड, दिग्दर्शकाची मोठी घोषणा!
वेतन किती मिळणार?
वयोमर्यादेचा विचार करता, 30 सप्टेंबर 2026 रोजी अॅडव्हायझर पदासाठी वय 40 ते 65 वर्षे आणि सिनियर कन्सल्टंट्स पदासाठी 39 वर्षांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे. तसेच यंग प्रोफेशनल्स पदासाठी 1 ऑक्टोबर 2026 रोजी वय 27 वर्षांपेक्षा कमी असावे. निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता आणि अनुभवानुसार दरमहा 30 हजार रुपये ते 40 हजार रुपये मानधन मिळणार असून, त्यासोबत अडीच हजार रुपये ते तीन हजार रुपये प्रवास भत्तादेखील दिला जाणार आहे.
हे ही वाचा : बीड : लेकीच्या शिक्षणासाठी 'माऊली' अनवाणी धावली, आता भारताच्या उपराष्ट्रपतींचा मोठा निर्णय!
'असा' करा अर्ज
या भरतीसाठी कोणतीही परीक्षा शुल्क नमूद करण्यात आलेली नाही. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना खादी व ग्रामोद्योग महामंडळाच्या अधिकृत www.kvic.gov.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026 असून, या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT












