मुंबईची खबर : प्रवाशांना मिळणार तात्काळ वैद्यकीय मदत, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय

मुंबई तक

• 02:05 PM • 17 Sep 2026

मध्य रेल्वेने आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू करण्याची योजना आखली आहे. यासोबतच काही जुन्या कक्षांची क्षमताही वाढवण्यात येत आहे.

Mumbai News

Mumbai News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

प्रवाशांना मिळणार तात्काळ वैद्यकीय मदत

point

मध्य रेल्वेचा मोठा निर्णय

Mumbai News : मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळावी यासाठी आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू करण्याची योजना आखली आहे. 43 प्रमुख स्थानकांवर ही सेवा सुरु करण्यात येणार आहे. या सुविधांची उभारणी आणि व्यवस्थापन करण्यासाठी खाजगी किंवा संबंधित संस्थांची नियुक्ती करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. यासोबतच काही जुन्या कक्षांची क्षमताही वाढवण्यात येत आहे.

हे वाचलं का?

12 वैद्यकीय कक्ष कार्यरत

एका समोर आलेल्या माहितीनुसार, केवळ 12 आपत्कालीन वैद्यकीय कक्ष पूर्णपणे कार्यरत असल्याचे समोर आले आहे. रेल्वेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या उत्तरानुसार, सध्याच्या 12 कक्षांपैकी तीन सुविधा 'ॲनी फाउंडेशन' या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने चालवल्या जात आहेत. तर उर्वरित नऊ आपत्कालीन कक्षांचे व्यवस्थापन मध्य रेल्वेच्या व्यावसायिक विभागामार्फत केले जात आहे. याशिवाय चेंबूर आणि मानखुर्द येथील दोन वैद्यकीय कक्षांचे काम पूर्ण झाले असून औषध परवाना मिळताच ते प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत.

हे ही वाचा : फार्महाऊसवर नेऊन सामुहिक अत्याचार केल्याचा तरुणीचा आरोप, माजी आमदारासह दोघांवर गुन्हा दाखल

मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

पावसाळ्यानंतर बांधकामाचे उर्वरित काम पूर्ण होताच खोपोली येथे विस्तारित आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू केला जाईल, असेही नमूद करण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तात्काळ वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याबाबत दिलेल्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने या सुविधांचा विस्तार करण्याचा आणि नवीन कक्ष उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा : डोंबिवलीत चार वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, 85 वर्षीय नराधमाला बेड्या

महत्त्वपूर्ण निर्णय

प्रवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे मानले जात आहे. वैद्यकीय आणीबाणीच्या प्रसंगी तातडीने मदक मिळण्यास यामुळे मदत होईल. लोकलने प्रवास करणाऱ्यांची वाढती लोकसंख्या लक्षात घेता हा निर्णय स्वागतार्ह आहे.