Mumbai News : मुंबई महानगरपालिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवादरम्यान नैसर्गिक जलस्रोतांवरील ताण कमी करण्यासाठी आणि विसर्जन प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी बीएमसीने 383 कृत्रिम विसर्जन तलावांची उभारणी केली आहे. पालिकेने मुंबईकरांच्या सोयीसाठी विभागांनुसार (वॉर्डनिहाय) या कृत्रिम तलावांची सविस्तर यादी जाहीर केली आहे. विविध पालिका प्रभागांमध्ये उभारण्यात आलेले हे कृत्रिम तलाव प्रामुख्याने सहा फुटांपर्यंतच्या घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.
ADVERTISEMENT
विविध सोयी-सुविधा आणि सुरक्षा
गणेशोत्सवाच्या काळात होणारी भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता, पालिकेने केवळ कृत्रिम तलावांवरच भर न देता प्रमुख नैसर्गिक विसर्जन स्थळांवरही विशेष व्यवस्था केली आहे. गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, जुहू बीच आणि पवई तलाव यांसारख्या मोठ्या आणि महत्त्वाच्या विसर्जन स्थळांवर बीएमसीकडून विविध सोयी-सुविधा आणि सुरक्षेच्या उपाययोजना सज्ज करण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा : लातूर हादरलं! प्रसिद्ध संस्थाचालकाने स्वत:वर गोळीबार करत संपवलं जीवन
प्रशासनाला सूचना
महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांनी शहरातील प्रमुख विसर्जन स्थळांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी कुर्ला येथील शीतल तलाव, मुलुंड येथील मोरया तलाव, पवई तलाव, के-उत्तर विभागातील शामनगर तलाव आणि जुहू बीच या ठिकाणच्या व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला. भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना या वेळी देण्यात आल्या.
हे ही वाचा : मनोज जरांगे पाटील प्रचंड संतापले, एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका
भाविकांसाठी सुविधा
या सर्व पाहणी दौऱ्यांचा मुख्य उद्देश विसर्जन स्थळांवरील सोयी-सुविधांची खात्री करणे आणि संपूर्ण विसर्जन प्रक्रिया सुरक्षित, शिस्तबद्ध व शांततेत पार पडेल याची खबरदारी घेणे हा होता. प्रशासनाच्या या पूर्वतयारीमुळे यंदाच्या गणेशोत्सवात मुंबईतील भाविकांना गणेशमूर्तींचे विसर्जन करणे अधिक सोयीस्कर आणि सुखकर होणार आहे.
ADVERTISEMENT












