मुंबईची खबर : गणेशोत्सवाच्या काळात कसं असेल मेट्रोचं वेळापत्रक? जाणून घ्या सविस्तर

मुंबई तक

• 05:08 PM • 13 Sep 2026

गणेशोत्सवाच्या काळात मेट्रोच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आले आहेत. गणेश भक्तांचा प्रवास सोयीस्कर व्हावा यासाठी रात्री उशीरापर्यंत गाड्या चालवल्या जाणार आहेत. कसं असेल वेळापत्रक, जाणून घ्या.

Mumbai News

Mumbai News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मुंबईची खबर : गणेशोत्सवाच्या काळात कसं असेल मेट्रोचं वेळापत्रक?

point

जाणून घ्या सविस्तर

Mumbai News : गणेशोत्सवाच्या काळात प्रवास सुखकर आणि सोयीस्कर व्हावा यासाठी मुंबईतील सर्व मेट्रो मार्गांवर उशिरापर्यंत सेवा पुरवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. 14 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या कालावधीत भाविकांना लालबागचा राजा, सिद्धिविनायक यांसह विविध प्रसिद्ध गणपती मंडळांना भेटी दिल्यानंतर रात्री उशिरा सुरक्षितपणे घरी परतता यावे, यासाठी मेट्रोच्या वेळा वाढवण्यात आल्या आहेत. मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडद्वारे संचालित वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या 'ब्लू लाईन-1' वर वर्सोवाहून घाटकोपरसाठी शेवटची ट्रेन रात्री 12.15 वाजता सुटेल. तर घाटकोपरहून वर्सोवासाठी शेवटची गाडी रात्री 12.40 वाजता निघून 1.03 वाजता वर्सोव्याला पोहोचेल.

हे वाचलं का?

असं असेल वेळापत्रक

त्याचप्रमाणे महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने (MMMOCL) मेट्रो लाईन 2A, 2B, 7 आणि 9 वर रात्री 12:30 वाजेपर्यंत सेवा विस्तारित करण्याची घोषणा केली आहे. नियमित वेळेनुसार रात्री 11 वाजता सुटणाऱ्या शेवटच्या गाड्या सणाच्या 12 दिवसांत रात्री 12.30 वाजता सुटतील. यामध्ये मेट्रो 2A वर अंधेरी वेस्ट आणि दहिसर ईस्ट, मेट्रो 7 आणि 9 वर गुंदवली आणि काशिगाव, तर लाईन 2B वर महाराष्ट्र नगर-मांडले आणि चेंबूर या अंतिम स्थानकांवरून रात्री 12.30 वाजता शेवटच्या गाड्या उपलब्ध होतील. भाविकांची गर्दी लक्षात घेता या सर्व मार्गांवर दररोज आवश्यकतेनुसार अतिरिक्त फेऱ्या चालवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

हे ही वाचा : जालना : चॉकलेटचं अमिष, 6 वर्षीय चिमुकलीवर 60 वर्षीय वृद्धाचा बलात्कार

अतिरिक्त 10 ते 15 फेऱ्या

या कालावधीत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी सामावून घेण्यासाठी मेट्रो नेटवर्कवर दररोज 10 ते 15 अतिरिक्त फेऱ्या जोडल्या जातील. आठवड्याच्या इतर दिवशी मेट्रो 2A वर 10 अतिरिक्त फेऱ्यांसह एकूण 299 सेवा, तर मेट्रो 7 आणि 9 वर 14 अतिरिक्त फेऱ्यांसह 290 सेवा चालवल्या जातील; तसेच मेट्रो 2B वर 15 अतिरिक्त फेऱ्यांसह 180 सेवा धावतील. शनिवारी या तिन्ही कॉरिडॉरवर अनुक्रमे 241, 237 आणि 180 सेवा उपलब्ध असतील, तर रविवारी अनुक्रमे 223, 219 आणि 180 सेवा चालवल्या जाणार आहेत.

हे ही वाचा : Govt Jobs : इस्रोमधील नोकरीची ही संधी सोडू नका, कसा कराल अर्ज?

12 वाजेपर्यंत चालणार सेवा

दुसरीकडे, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (MMRCL) देखील 'अक्वा लाईन-3' वर 14 ते 25 सप्टेंबरदरम्यान मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सेवा वाढवली आहे. कफ परेड आणि आरे जेव्हीएलआर या दोन्ही स्थानकांवरून नेहमी रात्री 10.30 वाजता सुटणाऱ्या शेवटच्या गाड्या गणेशोत्सवात मध्यरात्री 12 वाजेपर्यंत धावतील.