Govt Jobs : भारतीय रेल्वेमध्ये विविध पदांसाठी भरती, लगेच करा अर्ज

मुंबई तक

• 06:21 PM • 12 Sep 2026

भारतीय रेल्वेत विविध पदांसाठी भरती सुरु झाली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घ्या सविस्तर.

Indian Railway Recruitment

Indian Railway Recruitment

Google CTA

बातम्या हायलाइट

point

भारतीय रेल्वेमध्ये विविध पदांसाठी भरती

point

लगेच करा अर्ज

Indian Railways Recruitment : भारतीय रेल्वेने पॅरामेडिकल विभागातील विविध रिक्त पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. आरोग्य क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 560 जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये नर्सिंग सुपरिटेंडेंट, डायलिसिस टेक्निशियन, हेल्थ अँड मलेरिया इंस्पेक्टर ग्रेड II, फार्मासिस्ट, रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन, ECG टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट ग्रेड II अशा विविध पदांचा समावेश आहे. निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात कुठेही सेवा बजावण्याची संधी मिळणार असून 7 व्या वेतन आयोगानुसार वेतनस्तर 3 ते वेतनस्तर 7 दरम्यान वेतन श्रेणी लागू असेल.

हे वाचलं का?

शैक्षणिक पात्रता

प्रत्येक पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. नर्सिंग सुपरिटेंडेंट पदासाठी GNM किंवा B.Sc (Nursing) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, तर डायलिसिस टेक्निशियनसाठी B.Sc सोबत हेमोडायलिसिस डिप्लोमा किंवा दोन वर्षांचा अनुभव मागण्यात आला आहे. हेल्थ अँड मलेरिया इंस्पेक्टरसाठी B.Sc (रसायनशास्त्र) सोबत सॅनिटरी इंस्पेक्टर डिप्लोमा किंवा NTC अनिवार्य आहे. फार्मासिस्ट, रेडिओग्राफर, ECG टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट या पदांसाठी 12 वी किंवा B.Sc सह संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा किंवा पदवी (उदा. D.Pharm, DMLT, X-Ray किंवा ECG टेक्निशियन डिप्लोमा) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

हे ही वाचा : गायीवर नराधमाकडून अत्याचार, मालकाने रंगेहाथ पकडताच पळाला

असा करा अर्ज

उमेदवारांच्या वयाची गणना 1 जानेवारी 2027 रोजी केली जाईल. पदनिहाय वयोमर्यादा 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान ठेवण्यात आली असून, सरकारी नियमांनुसार मागासवर्गीय उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल. यामध्ये SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षांची सूट मिळणार आहे. परीक्षा शुल्काचा विचार करता सर्वसाधारण, OBC आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी 500 रुपये शुल्क आकारले जाईल, तर SC, ST, माजी सैनिक, ट्रान्सजेंडर, EBC आणि महिला उमेदवारांसाठी 250 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

हे ही वाचा : मुंबई फायनल! मनोज जरांगेंची मोठी घोषणा, आझाद मैदानावर कधी येणार?

अंतिम मुदत

या भरतीसाठी उमेदवारांना केवळ ऑनलाइन पद्धतीनेच (rrb.indianrailways.gov.in) अर्ज सादर करायचे आहेत. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवारांनी 14 ऑक्टोबरपर्यंत आपले अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे. अंतिम तारखेची वाट न पाहता पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वेळेत अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज पूर्ण करून प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. याविषयी सविस्तर जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल.