Railway Recruitment : नुकतंच शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेच्या उत्तर रेल्वे (Northern Railway) विभागात नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. विविध ट्रेडमधील अप्रेंटिसच्या एकूण 4651 जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांना अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.
ADVERTISEMENT
शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रतेचा विचार केला तर, उमेदवाराने किमान 50% गुणांसह दहावी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि त्यासोबतच संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय (ITI) प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. वयोमर्यादेच्या बाबतीत, 11 डिसेंबर 2026 रोजी उमेदवाराचे वय 15 ते 24 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे; तथापि, नियमानुसार एससी (SC) आणि एसटी (ST) प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे, तर ओबीसी (OBC) प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षांची सवलत देण्यात आली आहे.
हे ही वाचा : आमदार निवासस्थानात धक्कादायक प्रकार, काँग्रेस आमदाराच्या खोलीत तरुण अन् तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत
अर्जाची अंति मुदत
या अर्जासाठी जनरल आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागेल, तर एससी, एसटी, पीडब्ल्यूडी (PWD) आणि सर्व महिला उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून, इच्छुक व पात्र उमेदवारांनी 11 डिसेंबर 2026 या अंतिम मुदतीपूर्वी अर्ज करावा.
हे ही वाचा : मुंबईची खबर : बेस्टने प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर, सुट्ट्या पैशांच्या कटकटीवर आता नवा उपाय
'असा' करा अर्ज
रेल्वे विभागात तांत्रिक प्रशिक्षण आणि भविष्यातील रोजगाराच्या दृष्टीने ही एक महत्त्वाची संधी मानली जात आहे. अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी उत्तर रेल्वेच्या nr.indianrailways.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
ADVERTISEMENT












