मुंबईची खबर : दिवाळीत मेगा ब्लॉक असणार का? रेल्वेचा मोठा निर्णय

पृथ्वीराज पाटील

• 03:08 PM • 07 Nov 2026

दिवाळीत रेल्वे मेगा ब्लॉक असणार का असा प्रश्न अनेक मुंबईकरांना पडलेला आहे. याविषयी रेल्वेने माहिती दिली आहे.

Mumbai News

Mumbai News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

दिवाळीत मेगा ब्लॉक असणार का?

point

जाणून घ्या सविस्तर

Mumbai News : ऐन दिवाळीत लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेने रविवारी (8 नोव्हेंबर) मेन आणि हार्बर लाईनवर मेगा ब्लॉक घोषित केला आहे. नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हा ब्लॉक असल्यामुळे प्रवाशांना काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे प्रवाशांनी आपली दळणवळणाची तयारी त्यानुसार करणे गरजेचे ठरते.

हे वाचलं का?

मध्य रेल्वेवर ब्लॉकची वेळ

मध्य रेल्वेचा हा ब्लॉक मेन लाईनवर माटुंगा आणि मुलुंड दरम्यान सकाळी 11:05 ते दुपारी 3:55 वाजेपर्यंत असेल. या वेळेत स्लो लोकल ट्रेन्स डाऊन फास्ट लाईनवर वळवल्या जातील, तर ठाण्यातून सुटणाऱ्या अप स्लो सेवा मुलुंड स्थानकावर अप फास्ट लाईनवर वळवण्यात येतील. यामुळे या मार्गावरील प्रवाशांच्या प्रवासाच्या वेळेत बदल होऊन काहीसा विलंब होऊ शकतो.

हे ही वाचा : राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘व्हेंटिलेटर’ चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा! 'व्हेंटिलेटर 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

हार्बर लाईनवर ब्लॉकची वेळ

हार्बर लाईनवर पनवेल आणि वाशी दरम्यान सकाळी 11:05 ते दुपारी 4:05 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. या काळात पनवेलहून सुटणाऱ्या अप हार्बर सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) कडून पनवेल व बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन सेवा पूर्णपणे रद्द राहतील. तसेच, ट्रान्सहार्बर लोकल सेवांवरही याचा परिणाम होऊन केवळ ठाणे ते वाशी आणि नेरूळ दरम्यानच लोकल धावतील.

हे ही वाचा : नावडत्या उमेदवाराला मतदान केल्याने संतापला, मुलानं आईच्या डोक्यात काठी घालून संपवलं, वडिलांवरही हल्ला

'या' प्रवाशांना दिलासा

दुसरीकडे, पश्चिम रेल्वेने प्रवाशांना मोठा दिलासा देत रविवारी कोणताही मेगा ब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पश्चिम रेल्वेची उपनगरीय लोकल सेवा कोणत्याही व्यत्ययाशिवाय नेहमीप्रमाणे सुरळीत चालू राहील.