मुंबईची खबर : बेस्टच्या ताफ्यात 44 इलेक्ट्रिक बसेसची भर, 'या' मार्गांवर धावणार

मुंबई तक

04 Nov 2026 (अपडेटेड: 04 Nov 2026, 03:43 PM)

'बेस्ट'ने (BEST) प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. बेस्टने आपल्या ताफ्यात 44 नवीन AC इलेक्ट्रिक बसेस समाविष्ट केल्या आहेत.

Mumbai News

Mumbai News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

बेस्टमध्ये नव्या बसेसची भर

point

मुंबईकरांचा प्रवास होणार सुखकर

Mumbai News : 'बेस्ट'ने (BEST) प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. बेस्टने आपल्या ताफ्यात 44 नवीन पूर्णपणे वातानुकूलित (AC) इलेक्ट्रिक बसेस समाविष्ट केल्या आहेत. मंगळवारी (3 नोव्हेंबर)  मागाठणे डेपोमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात या बसेसचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले. या नवीन बसेस 12 मीटर लांबीच्या आहेत. या बसेसमुळे प्रवाशांची क्षमता वाढेल, बसची वाट पाहण्याचा वेळ कमी होईल आणि शहरातील प्रमुख मार्गांवरील प्रवास अधिक सोयीस्कर आणि आरामदायी होईल.

हे वाचलं का?

'या' मार्गांवर धावणार बसेस

या सर्व 44 नवीन बसेस मुंबईची पूर्व व पश्चिम उपनगरे तसेच ठाणे आणि मिरा रोड यांसारख्या शेजारील भागांना जोडणाऱ्या पाच महत्त्वाच्या मार्गांवर धावतील. यामध्ये कांदिवली, बोरीवली, चांदिवली, मिरा रोड आणि ठाणे स्थानक (पूर्व) यांसारख्या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे. ईव्ही ट्रान्स महाराष्ट्र प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमार्फत भाडेतत्त्वावर या बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या असून, यामुळे कंपनीचा बेस्ट ताफ्यातील सहभाग 94 बसेसवर पोहोचला आहे. याशिवाय, केंद्र सरकारच्या 'पीएम ई-ड्राइव्ह' योजनेअंतर्गत बेस्ट ताफ्यात आणखी पर्यावरणपूरक बसेस टप्प्याटप्प्याने जोडल्या जात आहेत.

हे ही वाचा : 'अश्विनी भिडेंना पगार देऊ नका...', सुप्रीम कोर्टाने का दिला एवढा कठोर निर्णय.. नेमकं घडलं तरी काय?

प्रदूषण अन् आवाज होणार कमी

नवीन बसेसमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या बसेसच्या बॅटरीचे वजन 16 टक्क्यांनी कमी करण्यात आले असून बॅटरी छतावर ठेवण्याऐवजी वाहनाच्या खालील भागात बसवण्यात आली आहे. तसेच यात नवीन 'सीसीएस-2' (CCS-2) चार्जिंग सिस्टीम वापरण्यात आली आहे, ज्यामुळे बसेस पूर्वीपेक्षा 58 टक्के वेगाने चार्ज होतात. या बसेस पूर्णपणे इलेक्ट्रिक असल्याने प्रदूषण आणि आवाज कमी करण्यासही मदत होईल.

हे ही वाचा : कल्याण-उल्हासनगरकरांना दिवाळीत सरकारकडून खास भेट, घेतला प्रचंड मोठा निर्णय!

बसवर 24 तास नजर

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या बसेसमध्ये विशेष सुविधा देण्यात आल्या आहेत. यामध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम (ABS), हायड्रोलिक स्टीअरिंग, सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे, व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम (VTS) आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी पॅनिक बटणे (Emergency Panic Buttons) बसवण्यात आली आहेत. व्हिडिओ ॲनालिटिक्सद्वारे या बसेसच्या हालचालींवर आणि सुरक्षेवर 24 तास नजर ठेवली जाईल. व्यस्त वेळेत या बसेसमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.