Govt Jobs : दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची संधी, महिन्याला दीड लाखांहून अधिक पगार

पृथ्वीराज पाटील

06 Nov 2026 (अपडेटेड: 06 Nov 2026, 04:36 PM)

दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांसाठी भरती सुरु झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 6 डिसेंबर आहे.

DVC Recruitment 2026

DVC Recruitment 2026

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनमध्ये भरती

point

अर्ज कसा करावा?

point

काय आहेत पात्रतेचे निकष?

DVC Recruitment 2026 : दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनमार्फत अभियांत्रिकी क्षेत्रातील तरुणांसाठी रोजगाराची एक मोठी आणि सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. संस्थेने एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (मेकॅनिकल), एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (इलेक्ट्रिकल), एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (सिव्हिल) आणि इतर दोन अशा विविध विषयांतील एकूण 108 पदांसाठी अधिकृत भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना DVC च्या देशातील कोणत्याही कार्यालयात पूर्णवेळ स्वरूपात नियुक्ती दिली जाईल.

हे वाचलं का?

शैक्षणिक पात्रता काय?

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित शाखेतील अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान विषयातील (B.E./B.Tech) पूर्णवेळ पदवी असणे अनिवार्य आहे. पदवी परीक्षेमध्ये सामान्य, ओबीसी (NCL) आणि ईडब्ल्यूएस (EWS) प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान 65% गुण, तर एससी (SC), एसटी (ST) आणि दिव्यांग (PwD) प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान 60% गुण असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवाराकडे संबंधित विषयातील वैध GATE-2025 (गेट-2025) गुणपत्रिका असणे बंधनकारक करण्यात आले आहे.

हे ही वाचा : तुळजापूर : माजी नगराध्यक्षाने क्रूरतेचा कळस गाठला, एकाचा मर्डर अन् दुसऱ्याला काळंनिळं होईपर्यंत मारलं

पगार किती मिळणार?

वयोमर्यादेचा विचार करता, ऑनलाईन अर्ज करण्याच्या अंतिम तारखेपर्यंत उमेदवाराचे कमाल वय 29 वर्षांपेक्षा जास्त नसावे. या भरतीअंतर्गत अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार (7th CPC) पे मॅट्रिक्स लेव्हल-10 (M2 ग्रेड) मध्ये 56,100 रुपये ते 1,77,500 रुपये या वेतनश्रेणीत आकर्षक पगार दिला जाईल. सरकारी निकषानुसार वयोमर्यादेत सूट आणि इतर भत्ते लागू राहतील.

हे ही वाचा : कंडका पाडणे म्हणजे नक्की काय? सतेज पाटलांनी सांगितला अर्थ

अर्जाची मुदत

या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 6 नोव्हेंबर पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 डिसेंबर 2026 आहे. भरतीबाबतची सविस्तर जाहिरात, अटी व शर्ती आणि ऑनलाईन अर्जाची लिंक पाहण्यासाठी उमेदवारांनी दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनच्या www.dvc.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.