SSC Recruitment : कर्मचारी निवड आयोगामार्फत (SSC) मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये (CAPF) उपनिरीक्षक तसेच सीआयएसएफ (CISF) मध्ये फायर उपनिरीक्षक पदांच्या एकूण 1871 जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत दिल्ली पोलिसात पुरुष उमेदवारांसाठी 205 आणि महिला उमेदवारांसाठी 112 पदे उपलब्ध आहेत. तसेच, CAPF मधील उपनिरीक्षक (GD) च्या 1320 जागा आणि CISF मधील उपनिरीक्षक (फायर - पुरुष) च्या 234 जागा भरल्या जाणार आहेत. या सर्व पदांसाठी वेतनश्रेणी पे-लेव्हल-6 (रु. 35,400 ते1,12,400) नुसार निश्चित करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
शैक्षणिक पात्रता काय?
या भरतीसाठी पदांनुसार शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. दिल्ली पोलिसातील पुरुष उपनिरीक्षक पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवीसह हलके वाहन चालक परवाना (LMV) आवश्यक आहे, तर महिला उपनिरीक्षक व CAPF (GD) उपनिरीक्षक पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी पुरेशी आहे. CISF मधील फायर उपनिरीक्षक पदासाठी उमेदवार B.Sc (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित) उत्तीर्ण असावा किंवा दहावी उत्तीर्णसह मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाईल्स, केमिकल, मायनिंग, एरोनॉटिकल अथवा टेलिकम्युनिकेशन यांपैकी एका शाखेतील इंजिनिअरिंग डिप्लोमाधारक असावा.
हे ही वाचा : डॉक्टर मारहाण प्रकरणात मोठी अपडेट, शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या अडचणीत होणार मोठी वाढ?
वयाची अट काय?
वयोमर्यादेची अट 1 ऑगस्ट 2026 रोजी ग्राह्य धरली जाईल. दिल्ली पोलीस आणि CAPF (GD) उपनिरीक्षक पदांसाठी उमेदवारांचे वय 20 ते 25 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे, तर फायर उपनिरीक्षक पदासाठी वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे ठेवण्यात आली आहे. शासकीय नियमांनुसार अनुसूचित जाती व जमातीतील (SC/ST) उमेदवारांना 5 वर्षे तर इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना 3 वर्षांची वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
हे ही वाचा : Lalbaugcha Raja 2026: आता अवघ्या काही तासात लालबागच्या राजाची पहिली झलक; किती वाजता होणार प्रथम दर्शन?
'असा' करा अर्ज
या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने (ssc.gov.in) अर्ज करायचा असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर आहे. अर्ज शुल्क सर्वसाधारण व OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100 रुपये ठेवण्यात आले असून SC/ST आणि माजी सैनिकांसाठी कोणतेही शुल्क नाही. निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात कुठेही सेवा बजावण्याची संधी मिळणार आहे.
ADVERTISEMENT












