Bank Of India Recruitment : बँक ऑफ इंडियाने माहिती तंत्रज्ञान (IT) विभागातील विविध वरिष्ठ व कनिष्ठ पदांसाठी तब्बल 205 जागांची विशेष भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत चीफ मॅनेजर (स्केल-IV) पदासाठी 10 जागा, सिनियर मॅनेजर (स्केल-III) साठी 49 जागा, मॅनेजर (स्केल-II) साठी 118 जागा आणि ऑफिसर (स्केल-I) साठी 28 जागा भरल्या जाणार आहेत. तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या आणि बँकिंग क्षेत्रात काम करण्याची संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक अत्यंत सुवर्णसंधी मानली जात आहे.
ADVERTISEMENT
शैक्षणिक पात्रता काय?
या भरतीसाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता संगणक विज्ञान, आयटी किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन या विषयात B.E./B.Tech अथवा MCA किंवा M.Sc. (CS/IT) असणे आवश्यक आहे. याशिवाय पदाच्या स्वरूपानुसार 1 ते 8 वर्षांच्या संबंधित कामाच्या अनुभवाची अट ठेवण्यात आली आहे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी नियमानुसार वयात सूट देण्यात आली आहे, ज्यामध्ये SC/ST वर्गासाठी 5 वर्षे तर OBC वर्गासाठी 3 वर्षांची सूट लागू राहील.
हे ही वाचा : मुंबईची खबर : मुंबईकरांनो, गणेशोत्सवासाठी गावी जाताय? 'हा' पास असल्यास मिळणार टोलमाफी
वेतन किती मिळणार?
निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी दिली जाणार असून बँक ऑफ इंडियाच्या वेतन नियमांनुसार विविध भत्ते आणि पे-स्केल उपलब्ध होतील. यामध्ये ऑफिसर (स्केल-I) पदासाठी 48,480 ते 85,920 मॅनेजर (स्केल-II) साठी 64,820 ते 93,960 सिनियर मॅनेजर (स्केल-III) साठी 85,920 ते 1,05,280 आणि चीफ मॅनेजर (स्केल-IV) पदासाठी 1,02,300 ते 1,20,940 पर्यंत मूळ वेतनश्रेणी देय राहील. या पदांवर अंतिम निवड होणाऱ्या उमेदवारांना संपूर्ण भारतात कुठेही सेवा बजावण्याची तयारी ठेवावी लागेल.
हे ही वाचा : वाशीम : ZP शिक्षक विद्यार्थीनींना करायचा चुकीचा स्पर्श, शिक्षिकेमुळे सगळं उघडकीस
'असा' करा अर्ज
या प्रक्रियेसाठी केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार असून अर्जाची अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2026 ही निश्चित करण्यात आली आहे. सर्वसाधारण, OBC आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1180 इतकी अर्ज फी आकारली जाईल, तर SC, ST आणि दिव्यांग (PWD) उमेदवारांसाठी ही फी 175 इतकी आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला (bankofindia.bank.in) भेट देऊन विहित मुदतीत आपले ऑनलाइन अर्ज नोंदवावेत, असे आवाहन बँक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT












