Govt Jobs : केंद्रीय वखार महामंडळात विविध पदांसाठी भरती, 90 हजारांहून अधिक पगार

मुंबई तक

• 04:18 PM • 18 Oct 2026

केंद्रीय वखार महामंडळात विविध पदांसाठी भरती सुरु झाली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन दिले जाणार आहे. यासाठी अर्ज कसा करावा, जाणून घ्या.

CWC Recruitment

CWC Recruitment

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

केंद्रीय वखार महामंडळात भरती

point

अर्ज कसा करावा?

CWC Recruitment : केंद्रीय वखार महामंडळात (Central Warehousing Corporation) असिस्टंट मॅनेजर आणि ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह पदनामांच्या तब्बल 327 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती अंतर्गत असिस्टंट मॅनेजर प्रवर्गात जनरल (70), टेक्निकल (60), फायनान्स (10), सिव्हिल इंजिनिअरिंग (22), इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (05) आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग (04) अशी पदे भरली जाणार आहेत. याशिवाय ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह प्रवर्गामध्ये जनरल (78) आणि टेक्निकल (78) अशा दोन्ही विभागांत मिळून एकूण 156 पदे उपलब्ध आहेत. 

हे वाचलं का?

शैक्षणिक पात्रता काय?  

या विविध पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ठरवून देण्यात आली आहे. असिस्टंट मॅनेजर (जनरल) साठी कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा, टेक्निकलसाठी संबंधित शाखेतील B.E./B.Tech आणि फायनान्ससाठी B.Com सह तीन वर्षांचा अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवीसह CA/CMA इंटरमीडिएट असणे गरजेचे आहे. इंजिनिअरिंग विभागातील पदांसाठी सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल शाखेची B.E./B.Tech पदवी आवश्यक आहे. ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (जनरल) पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी तर ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (टेक्निकल) साठी कृषी, बॉटनी, झूलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री, फूड सायन्स किंवा केमिस्ट्री या विषयातील B.Sc. पदवी व संगणक हाताळणीचे (MS Office) मूलभूत ज्ञान अनिवार्य आहे.

हे ही वाचा : मुंबईची खबर : पाणीपुरवठा करताना होते 34 टक्के गळती, आता BMC चा महत्त्वाचा निर्णय

पगार किती?

उमेदवारांचे वय 15 नोव्हेंबर 2026 रोजी 18 ते 28 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. शासकीय नियमांनुसार इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना वयोमर्यादेत 3 वर्षे आणि अनुसूचित जाती/जमाती (SC/ST) उमेदवारांना 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात कुठेही सेवा बजावण्याची संधी मिळेल. वेतनश्रेणीबाबत बोलायचे झाल्यास, असिस्टंट मॅनेजर पदासाठी 40,000 ते 1,40,000 रुपये तर ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह पदासाठी 29,000 ते 93,000 असे आकर्षक वेतन मिळणार आहे.

हे ही वाचा :  दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, बस-कारच्या अपघातात पाच जणांचा अंत

'असा' करा अर्ज

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज शुल्क सामान्य, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी उमेदवारांसाठी 1350 रुपये आहे; तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग, माजी सैनिक आणि महिला उमेदवारांसाठी 500 रुपये निश्चित करण्यात आले आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर आहे. अधिक माहिती व अर्जासाठी उमेदवारांनी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाला (cewacor.nic.in) भेट द्यावी.