Supreme Court Recruitment : भारतीय सर्वोच्च न्यायालयाने विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरती मोहिमेअंतर्गत 'ज्युनिअर कोर्ट अटेंडंट' (Junior Court Attendant) या पदाच्या एकूण 130 जागा भरल्या जाणार आहेत. सरकारी क्षेत्रात आणि विशेषतः देशाच्या सर्वोच्च न्यायालयात नोकरी मिळवण्याची इच्छा असलेल्या गरजू आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक अत्यंत उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.
ADVERTISEMENT
शैक्षणिक पात्रता काय?
या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त मंडळातून किमान दहावी ते बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवारांचे वय 01 ऑक्टोबर 2026 रोजी 18 ते 27 वर्षांदरम्यान असावे. शासकीय नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे, ज्यामध्ये अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) उमेदवारांना 05 वर्षे, तर इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना 03 वर्षांची सूट लागू राहील.
हे ही वाचा : गडचिरोली : कंत्राटदाराकडून लाच घेताना रंगेहात पकडलं, भाजपचा नगरसेवक ACB च्या जाळ्यात
पगार किती मिळणार?
या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना दिल्ली येथे नियुक्ती दिली जाईल. वेतनमानाबाबत सांगायचे तर, 'पे मॅट्रिक्स'च्या लेव्हल 3 नुसार 21,700 रुपये ते 69,100 रुपये दरम्यान वेतनश्रेणी असेल. यामध्ये सुरुवातीचे मूळ वेतन (Basic Pay) 21,700 रुपये अधिक नियमानुसार इतर सरकारी भत्तांचा समावेश असेल. अर्जासाठी सामान्य (GEN) प्रवर्गातील उमेदवारांना 1500 रुपये परीक्षा शुल्क आकाराले जाईल, तर SC, ST, OBC, PWD आणि माजी सैनिक (ExSM) उमेदवारांसाठी हे शुल्क 750 रुपये ठेवण्यात आले आहे.
हे ही वाचा : नागपूर: फार्महाऊसवर अश्लील डान्स, चार नर्तिका आणि 22 पुरूषांवर कारवाई
अर्जाची शेवटची तारीख
इच्छुक उमेदवारांना आपले अर्ज केवळ 'ऑनलाइन' (Online) पद्धतीने सादर करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2026 ही निश्चित करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी मुदतीपूर्वी आणि अधिकृत संकेतस्थळावरूनच (www.sci.gov.in) अर्ज प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT












