मुंबईची खबर : पाणीपुरवठा करताना होते 34 टक्के गळती, आता BMC चा महत्त्वाचा निर्णय

मुंबई तक

• 03:25 PM • 18 Oct 2026

बीएमसीने जलवाहिन्यांमधून होणारी गळती रोखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जमिनीखालील नेमकी गळती शोधणे शक्य होणार आहे.

Mumbai Water Cut

Mumbai Water Cut

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

पाणीगळती रोखण्यासाठी बीएमसीचा मोठा निर्णय

point

सोनार तंत्रज्ञानाचा वापर करणार

Mumbai Water Cut : पावसाने दडी मारल्यामुळे मुंबईत सध्या 10 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. शहराला भेडसावणारी पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई शहराला दररोज सुमारे 4,600 दशलक्ष लिटर पाण्याची गरज असताना प्रत्यक्ष 4,100 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मात्र, यातील तब्बल 1394 दशलक्ष लिटर म्हणजेच 34 टक्के पाणी गळती आणि चोरीमुळे वाया जाते. शहरातील सुमारे 6000 किलोमीटर लांबीच्या मुख्य जलवाहिन्यांचे जाळे अनेक दशके जुने झाले असल्याने ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. यावर उपाय म्हणून बीएमसीने सोनार तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे वाचलं का?

काय आहे SONAR तंत्रज्ञान?

सोनार (SONAR) म्हणजे Sound Navigation and Ranging. हे ध्वनीतरंगांवर आधारित अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. यामुळे जमिनीखालील नेमकी गळती शोधणे शक्य होणार आहे. याचा अजून एक फायदा म्हणजे अनावश्यक खोदकाम यामुळे टाळता येणार आहे. सध्या बीएमसी वर्षाला 60 ते 70 किलोमीटर जुन्या जलवाहिन्या बदलते; मात्र आता हे प्रमाण वाढवून दरवर्षी 250 ते 300 किलोमीटर पर्यंतच्या जलवाहिन्या बदलण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पुढील चार वर्षांत 25 ते 30 टक्के जुन्या जलवाहिन्या बदलून पाण्याची गळती लक्षणीयरीत्या कमी केली जाईल.

हे ही वाचा : दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, बस-कारच्या अपघातात पाच जणांचा अंत

सप्टेंबरपर्यंत पाणीसाठी पुरवण्यासाठी...

मुंबईला तुलसी, विहार, भातसा, तानसा, मोडक सागर, अप्पर वैतरणा आणि मिडल वैतरणा या सात तलावांमधून पाणीपुरवठा केला जातो. यंदा पाऊस कमी झाल्यामुळे आणि वाढत्या तापमानामुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत असल्याने, पाण्याचा साठा पुढील वर्षी सप्टेंबरपर्यंत पुरवण्यासाठी पालिकेने पाणीकपात लागू केली आहे. सध्या जलवाहिनी फुटल्यास प्रत्यक्ष गळती शोधणे हे निव्वळ अंदाजावर आधारित असते. बऱ्याचदा गळती एका ठिकाणी असते आणि पाणी दुसऱ्याच ठिकाणी रस्त्यावर येते; ज्यामुळे कामगारांना रस्ते उकरून अनेक ठिकाणी शोध घ्यावा लागतो. यामुळे रस्ते खराब होतात आणि वेळही वाया जातो.

हे ही वाचा : नागरिकांच्या भावनेवर निकाल लागू शकत नाही, असं गवई का बोलले?

बीएमसीकडून मुंबईकरांना आवाहन

यासोबतच पालिकेने 2021 मध्ये सुरू केलेल्या 'सर्वसमावेशक पाणी धोरणा'चा (Water for All Policy) विस्तार सुरू ठेवला असून, झोपडपट्ट्यांमध्ये अधिकृत नळ जोडण्या दिल्या जात आहेत. यासोबतच पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन बीएमसीने नागरिकांना केले आहे.