गेवराई तालुक्यात भीषण दुर्घटना, मोटारसायकल अपघातात हवाई दलातील जवानाचा मृत्यू

रोहिदास हातागळे

• 03:19 PM • 14 Nov 2026

Beed Crime News : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गढी येथे रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास झालेल्या या भीषण मोटारसायकल अपघातात भारतीय हवाई दलात कार्यरत असलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.

Beed Crime News

Beed Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात भीषण अपघात

point

भारतीय हवाई दलात कार्यरत असलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू

Beed Crime News : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गढी येथे रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास झालेल्या या भीषण मोटारसायकल अपघातात भारतीय हवाई दलात कार्यरत असलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. तसेच त्याचा सख्खा भाऊ देखील गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Astrology : 'या' राशींना होणार आर्थिक लाभ, जाणून घ्या 12 राशींचे भविष्य

मृत जवानाची गोविंद भागवत नेहरकर (वय 30) अशी ओळख समोर आली होती. तसेच भाऊ गोपाळ भागवत नेहरकर (वय 26)हे अपघातात गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती समोर आली. त्यांच्यावर गेवराई येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू केल्याची माहिती समोर आली. 

हवाई दलात कार्यरत असलेल्या भावाचा अपघाती मृत्यू 

घडलेल्या घटनेनुसार, दोन्ही सख्खे भाऊ एकाच मोटारसायकलवरून प्रवास करताना गढी परिसरात भीषण अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत व्यक्ती गोविंद नेहरकर यांचा मृतदेह हा उत्तरीय तापणीसाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. 

हे ही वाचा : 'माझ्या बहिणीसोबत बोलता..', ऑनर किलिंगचं प्रकरण; तरुणाची बेदम मारहाण करत हत्या

ढोकवजगाव गावावर दुःखाचा डोंगर

भारतीय हवाई दलात देशसेवा बजावणाऱ्या जवानाचा अपघाती मृत्यू झाल्याने ढोकवजगाव गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेनं गावात शोककळा पसरली आहे. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.