Govt Jobs : भारत सरकारच्या बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, महिन्याला 60 हजारांहून अधिक पगार

पृथ्वीराज पाटील

13 Nov 2026 (अपडेटेड: 13 Nov 2026, 04:02 PM)

एक्झिम बँकेत विविध पदांसाठी भरती सुरु झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 11 डिसेंबर आहे. अर्ज कसा कराल? जाणून घ्या सविस्तर.

Exim Bank Recruitment

Exim Bank Recruitment

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

एक्झिम बँकेत नोकरीची संधी

point

काय आहेत पात्रतेचे निकष?

point

पगार किती मिळणार?

Exim Bank Recruitment : सरकारी बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक अत्यंत सुवर्णसंधी चालून आली आहे. एक्सपोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया अर्थात 'इंडिया एक्झिम बँक' (India Exim Bank) मार्फत 'मॅनेजमेंट ट्रेनी' (Management Trainee - MT) आणि 'मॅनेजर' (Manager) या महत्त्वाच्या पदांच्या भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे देशभरातील एकूण 120  रिक्त पदे भरली जाणार आहेत. 

हे वाचलं का?

शैक्षणिक पात्रता काय?

या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित पदानुसार एमबीए (MBA), पीजीडीबीए (PGDBA), पीजीडीबीएम (PGDBM), एमएमएस (MMS), सीए (CA) किंवा इतर संबंधित व्यावसायिक पात्रता असलेले उमेदवार या पदांसाठी पात्र ठरतील. पदानुसार शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादेचे सविस्तर निकष बँकेच्या अधिकृत भरती अधिसूचनेनुसार लागू राहतील, त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व अटी व्यवस्थित तपासणे गरजेचे आहे.

हे ही वाचा : 'भाजपच्या सापळ्यात अडकू नका, योग्य वेळी निर्णय घेऊ..' छठ पुजेवरुन राज ठाकरे आक्रमक

अर्जाची अंतिम मुदत

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 27 नोव्हेंबर 2026 पासून सुरू होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 11 डिसेंबर 2026 पर्यंत आपले अर्ज सादर करता येतील. अर्जाची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनेच राबवली जाणार असून, विहित मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता वेळेत आपला अर्ज भरून पूर्ण करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हे ही वाचा : नागपूर : कुख्यात गुन्हेगाराची भर चौकात निर्घृण हत्या, सिमेंटच्या कुंडीनं ठेचलं डोकं, मेहुण्यावर संशय

पगार किती मिळणार?

अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी एक्झिम बँकेच्या www.eximbankindia.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. या वेबसाइटवर करिअर किंवा रिक्रूटमेंट विभागात जाऊन भरतीची सविस्तर जाहिरात वाचता येईल आणि ऑनलाइन अर्ज भरता येईल. सार्वजनिक क्षेत्रातील बँकेत काम करण्याची ही मोठी संधी असून, या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा सुमारे 65,000 रुपये इतके आकर्षक वेतन दिले जाणार आहे.