नागपूर : कुख्यात गुन्हेगाराची भर चौकात निर्घृण हत्या, सिमेंटच्या कुंडीनं ठेचलं डोकं, मेहुण्यावर संशय
नागपूरमध्ये भरचौकात एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. ही हत्या मृताच्या मेहुण्यानेच केली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नागपूरमध्ये हत्येने खळबळ
भरचौकात तरुणाला संपवलं
नेमकं काय घडलं?
Nagpur Crime : नागपूरमधील अत्यंत गजबजलेल्या मेडिकल चौक परिसरात गुरुवारी (12 नोव्हेंबर) रात्री धक्कादायक घटना घडली. एका कुख्यात गुंडाची भररस्त्यात अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. गुरुवारी रात्री साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास मेडिकल चौकातून तुकडोजी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर 32 वर्षीय पलाश उर्फ गनी प्रकाश वासनिक याच्यावर हल्लेखोरांनी अचानक हल्ला चढवला.
हल्लेखोरांनी सुरुवातीला पलाशवर धारदार शस्त्राने सपासप वार केले आणि त्यानंतर जवळच असलेल्या सिमेंटच्या जड कुंडीने त्याचे डोके ठेचून त्याला जागीच ठार केले. या धक्कादायक प्रकारात मृत पलाशचा मेहुणा चिंटू उर्फ आयुष धुपे आणि त्याच्या एका साथीदाराचे नाव समोर येत असून, कौटुंबिक नात्यातील या खूनी संघर्षामुळे परिसरात मोठी चर्चा रंगली आहे.
भरचौकात रक्तरंजित थरार
भरचौकात घडलेल्या या रक्तरंजित थरारामुळे मेडिकल चौक परिसरात काही काळ मोठी पळापळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेनंतर परिसरातील अनेक हातगाडी चालक आणि व्यापाऱ्यांनी भीतीपोटी आपली दुकाने तातडीने बंद करून तिथून काढता पाय घेतला. या घटनेची माहिती मिळताच अजनी, इमामवाडा आणि हुडकेश्वर पोलीस ठाण्यांची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी पंचनामा करून तपासाला सुरुवात केली.
हे ही वाचा : 'भाजपच्या सापळ्यात अडकू नका, योग्य वेळी निर्णय घेऊ..' छठ पुजेवरुन राज ठाकरे आक्रमक
कुख्यात हिस्ट्रीशीटर
मृत पलाश उर्फ गनी वासनिक हा रामबाग परिसरातील रहिवासी असून पोलीस रेकॉर्डवरील इमामवाडा आणि रामबाग भागातील कुख्यात हिस्ट्रीशीटर होता. त्याच्याविरोधात लुटमार, खंडणी, जाळपोळ यांसारख्या अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद होती. विशेष म्हणजे, 2023 मध्ये दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) बनावट पासपोर्ट आणि अवैध वास्तव्याच्या प्रकरणातही पलाशला अटक केली होती. त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या पलाशची हत्या नेमकी कोणत्या वादातून किंवा जुन्या वैमनस्यातून झाली, याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
हे ही वाचा : कारागृहात कैद्यांची क्रूरता, 20 वर्षीय तरुणावर साडी नेसवून अनैसर्गिक अत्याचार, 19 जणांविरोधात गुन्हा
सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय?
या हत्याकांडानंतर आरोपी चिंटू उर्फ आयुष धुपे आणि त्याचा साथीदार घटनास्थळावरून पसार झाले असून, पोलीस पथके त्यांचा कसून शोध घेत आहेत. हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी कौटुंबिक कलह किंवा आर्थिक वादातून ही हत्या झाली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, फरार आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
