दुष्काळाचं संकट 2027 मध्ये कायम राहणार? तज्ज्ञांनी काय सांगितलं?
महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी तूट नोंदवली. आता 2027 च्या मान्सूनबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. यामागे कारण ठरत आहे प्रशांत महासागरात सक्रिय झालेला एल निनो.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सुपर एल निनोचा धोका
2027 मध्येही पावसाचं संकट
Maharashtra Rain : उत्तर भारतातील पश्चिमी विक्षोभाचा (Western Disturbance) प्रभाव आणि महाबळेश्वरपेक्षाही जळगावमध्ये नोंदवली गेलेली किमान तापमानाची घट यामुळे राज्यात हिवाळ्याच्या आगमनाची चर्चा सुरू असतानाच, यावर्षीचा ‘सुपर एल निनो’ (Super El Nino) अधिक तीव्र रूप धारण करत असल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. गेल्या 75 वर्षांतील हा अत्यंत शक्तिशाली टप्पा मानला जात असून, या मानवनिर्मित आणि नैसर्गिक हवामान बदलांमुळे महाराष्ट्रात यावर्षी कडाक्याच्या थंडीचा अनुभव येणार नाही, तर दिवसभरात ऑक्टोबर हिटसारखा तीव्र उकाडा जाणवत राहील.
गारपीट होण्याची शक्यता
राज्यात उत्तर भारतासारख्या बर्फवृष्टीची शक्यता नसली, तरी पश्चिमी विक्षोभाच्या प्रभावामुळे फेब्रुवारी व मार्च महिन्यात महाराष्ट्राच्या काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एल निनोचा हा प्रभाव प्रामुख्याने जानेवारीच्या मध्यापर्यंत टिकणार असून, त्यानंतर तो हळूहळू कमी होईल. या अवर्षणसदृश परिस्थितीमुळे आधीच मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात शेती पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, विहिरी आणि तलावांमधील बाष्पीभवनाचा वेग वाढल्याने आगामी उन्हाळा अधिक त्रासदायक ठरणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
हे ही वाचा : भाजपला रोखण्यासाठी नवी युती, पण फटका INDIA आघाडीलाच? 'असं' आहे नवं राजकीय समीकरण!
शेतकऱ्यांनी काय करावे?
या प्रतिकूल हवामान परिस्थितीत रबी हंगामातील पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी कमी पाणी लागणाऱ्या पिकांची निवड करणे, मल्चिंग पद्धतीचा वापर करणे आणि ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे आवश्यक आहे. पाणीटंचाईमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही बिकट होऊ शकतो. मात्र, जानेवारीनंतर एल निनोची स्थिती तातडीने 'ला निना' (La Nina) मध्ये बदलणार असल्याने आगामी 2027 चा पावसाळा अत्यंत सुसूत्री आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत चांगला राहील, अशी दिलासादायक चिन्हे एआय आणि हवामान मॉडेल्सच्या डेटावरून मिळत आहेत.
हे ही वाचा : Weather Update: महाराष्ट्र गारठणार.. आता थंडीची चाहूल! मुंबईपासून नाशिकपर्यंत कसं असेल हवामान?
मानवी आरोग्यावरही परिणाम
हवामान अंदाजांबाबत बोलताना, पूर्वीच्या तुलनेत भारतीय हवामान खात्याची (IMD) यंत्रणा अधिक अचूक झाली असली तरी सूपर कम्प्युटिंग आणि डेटा संकलनामध्ये अजूनही काही मर्यादा असल्याचे स्पष्ट करण्यात आले. जागतिक तापमानवाढ (Global Warming) आणि सौर चक्रातील बदलांमुळे हवामानात होणारे हे विषम बदल मानवी आरोग्यावरही परिणाम करत असल्याने नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या सर्व हवामानातील बदलांमुळे येणारे काही महिने आव्हानात्मक असले, तरी आगामी वर्षात पावसाची स्थिती सुधारण्याची पूर्ण शक्यता आहे.
