मुलगी प्रेमात पडली, पण जात आडवी आली, बापाने ओढणीने गळा आवळून संपवलं

gujarat honour killing : दुसऱ्या जातीतील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याने वडिलांनी 21 वर्षीय मुलीची हत्या केल्याचा आरोप आहे. दिवाळीच्या रात्री दुपट्ट्याने गळा आवळून हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे.

ADVERTISEMENT

gujarat honour killing
gujarat honour killing
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

मुलगी प्रेमात पडली, पण जात आडवी आली,

point

बापाने ओढणीने गळा आवळून संपवलं

गुजरातमधील आणंद जिल्ह्यातून ऑनर किलिंगची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुसऱ्या जातीतील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून वडिलांनीच आपल्या 21 वर्षीय मुलीची हत्या केल्याचा आरोप आहे. दिवाळीच्या रात्री वडील आणि मुलीमध्ये याच विषयावरून वाद झाला. त्यानंतर वडिलांनी मुलीच्याच ओढनीने तिचा गळा आवळल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. सुरुवातीला मुलीचा मृत्यू आत्महत्या किंवा नैसर्गिक कारणाने झाल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांना मृत्यूच्या परिस्थितीबाबत संशय आल्याने प्रकरणाचा तपास सुरू झाला. शवविच्छेदन अहवालातून गळ्यावर दबाव आल्याने गुदमरून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी पोलिसांनी वडिलांविरोधात कारवाई केली आहे. कौशलकुमार पटेल असे आरोपी वडिलांचे नाव असून सान्या पटेल असे मृत तरुणीचे नाव आहे.

 जाती वेगवेगळ्या असल्याने वडिलांना नातं मान्य नव्हतं 

ही घटना आणंद जिल्ह्यातील खंभात तालुक्यात असलेल्या मेतपूर गावात घडली. सान्या ही कौशलकुमार पटेल यांची 21 वर्षीय एकुलती एक मुलगी होती. तिने वडोदरा येथून बीकॉमचे शिक्षण पूर्ण केले होते. गावातीलच एका तरुणासोबत तिचे गेल्या वर्षभरापासून प्रेमसंबंध होते. मात्र, दोघांच्या जाती वेगवेगळ्या असल्याने वडिलांना हे नाते मान्य नव्हते. मुलीने संबंधित तरुणाशी बोलणे बंद करावे आणि हे प्रेमसंबंध संपवावेत, असे कौशलकुमार यांनी तिला अनेकदा सांगितले होते. संबंधित तरुणाच्या कमाईबाबतही वडिलांची हरकत होती. मात्र, सान्या आपल्या निर्णयावर ठाम होती. ती त्या तरुणाशी फोनवर बोलत राहिली. यामुळे घरात वारंवार तणावाचे वातावरण निर्माण होत होते. दिवाळीच्या रात्रीही याच विषयावरून वडील आणि मुलीमध्ये चर्चा सुरू झाली.

हेही वाचा : स्वतःला कुरूप समजायची 19 वर्षीय विद्यार्थिनी, शेवटी घडलं भयंकर; गंभीर मानसिक आजाराची थरारक कहाणी!

'मी तुझा गळा आवळला तर काय होईल?'

पोलिसांच्या माहितीनुसार, दिवाळीच्या रात्री कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र बसले होते. रात्री उशिरा घरातील इतर सदस्य झोपण्यासाठी गेले. त्यानंतर स्वयंपाकघरात कौशलकुमार आणि सान्या यांच्यात पुन्हा प्रेमसंबंधांवरून चर्चा झाली. वडिलांनी तिला संबंधित तरुणासोबतचे नाते संपवण्यास सांगितले. मात्र, सान्याने त्यास नकार दिला. यावेळी वडिलांनी कथितपणे तिला, 'मी तुझा गळा आवळला तर काय होईल?' असे विचारले. सान्याने या बोलण्याकडे गांभीर्याने पाहिले नाही. मात्र, त्यानंतर कौशलकुमार यांनी तिच्याच दुपट्ट्याने गळा आवळल्याचा आरोप आहे. यात सान्याचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूनंतर हा प्रकार आत्महत्या किंवा सामान्य मृत्यू असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यानंतर सान्याचा मृतदेह खंभात जनरल रुग्णालयात नेण्यात आला.

रुग्णालयातील डॉक्टरांना सान्याच्या मृत्यूबाबत संशय आल्याने त्यांनी फॉरेन्सिक तपासणी आणि शवविच्छेदन करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार मृतदेहाचे फॉरेन्सिक शवविच्छेदन करण्यात आले. अहवालात गळ्यावर दबाव आल्याने श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. वैद्यकीय भाषेत याला 'लिगेचर स्ट्रँग्युलेशन' असे म्हटले जाते. म्हणजेच कपड्याने किंवा अन्य वस्तूने गळा आवळल्यामुळे श्वास रोखला जाणे. शवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांनी हत्येच्या संशयावरून तपास सुरू केला. कौशलकुमार पटेल यांची चौकशी करण्यात आली. पोलिसांच्या दाव्यानुसार, चौकशीदरम्यान त्यांनी मुलीची हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. पोलिसांकडून या घटनेकडे ऑनर किलिंग म्हणून पाहिले जात आहे.