स्वतःला कुरूप समजायची 19 वर्षीय विद्यार्थिनी, शेवटी घडलं भयंकर; गंभीर मानसिक आजाराची थरारक कहाणी!
गोरखपूर येथील एका 19 वर्षीय नीट परीक्षेच्या तयारी करणाऱ्या तरुणीने दोन वर्षांत तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. तिला 'बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर'चे निदान झाले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'नीट'च्या विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल
काय आहे बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर?
Crime News : वैद्यकीय प्रवेश परीक्षेची (NEET) तयारी करणाऱ्या 19 वर्षांच्या तरुणीने आपण पुरेसं सुंदर दिसत नाही या नैराश्यातून गेल्या दोन वर्षांत तब्बल तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतरांच्या मते ही तरुणी सुंदर असूनही, जेव्हा ती आरशात पाहते तेव्हा तिला स्वतःचा चेहरा अत्यंत कुरूप वाटतो आणि याच न्यूनगंडामुळे तिने तीनदा आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रत्येक वेळी नशिबाने तिला वाचवले. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील ही तरुणी आहे.
मुलीच्या या वारंवार होणाऱ्या आत्महत्येच्या प्रयत्नांमुळे तिचे आई-वडील प्रचंड चिंतेत होते आणि अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर त्यांनी अखेर तिला एका मानसोपचारतज्ज्ञाकडे नेले. तिथे समुपदेशनादरम्यान या तरुणीने आपल्या मनातील सर्व वेदना मोकळेपणाने मांडल्या, ज्यानंतर तिला 'बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर' (Body Dysmorphic Disorder) हा मानसिक आजार असल्याचे निदान झाले.
आरशासमोर उभं राहिल्यावर...
या तरुणीची आई शिक्षिका असून वडील प्रशासकीय सेवेत आहेत आणि तिने स्वतः बारावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवून ती सध्या नीटची तयारी करत आहे. तिच्याकडे प्रेमळ पालक आणि चांगले मित्र असूनही, ती तिचा बराचसा मोकळा वेळ आरशासमोर उभे राहून स्वतःच्या प्रतिमेशी झगडण्यात घालवते. रोज सकाळी आरशात पाहिल्यावर तिला तिचे नाक वाकडे, चेहरा अनाकर्षक, पोट सुटलेले आणि केस विचित्र असल्याचे भासते आणि ती वारंवार स्वतःचे रूप सुधारण्याचा प्रयत्न करत राहते.
हे ही वाचा : अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी सुजय विखे, उपाध्यक्षपदी देशमुख; विखे-थोरात एक्स्प्रेस जोरात!
'सर्वजण हसताहेत असं वाटतं'
स्वतःला सुंदर दाखवण्यासाठी ती कधी मेकअपचा आधार घेते तर कधी फोनवरील फिल्टर्स वापरून फोटो काढते. महाविद्यालयात गेल्यावरही सर्वजण आपल्याकडेच पाहून आपल्या उणिवांवर हसत आहेत असे तिला वाटते, ज्यामुळे कोणाचे लक्ष जाऊ नये म्हणून ती नेहमी वर्गात सर्वात मागच्या बाकावर बसते आणि ग्रुप फोटोमध्येही आपला चेहरा लपवते.
हे ही वाचा : 13 शिक्षकांची आत्महत्या, 400 कोटींची थकबाकी; पुण्यातील प्रसिद्ध शिक्षणसंस्थेला उच्च न्यायालयाचा दणका
CBT द्वारे उपचार
या असह्य मानसिक त्रासामुळे तिने आतापर्यंत तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला, ज्यामध्ये एकदा तिने स्वतःच्या हाताची नस देखील कापली होती. कानपूर आणि गोरखपूरमध्ये अनेक ठिकाणी उपचार करूनही तिच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने, तिच्या पालकांनी एप्रिल 2026 मध्ये तिला मानसोपचारतज्ज्ञांकडे नेले. समुपदेशनानंतर तिला या आजारासाठी योग्य उपचारांची गरज असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले आणि त्यांनी 'कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी' (CBT) द्वारे तिच्यावर उपचार सुरू केले. या योग्य समुपदेशन आणि थेरपीच्या मदतीने गेल्या सात महिन्यांत या तरुणीच्या मानसिक आरोग्यात लक्षणीय सुधारणा झाली असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांनी सांगितले आहे.
