दहावीच्या विद्यार्थ्याने 'त्या' दोघांना आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं, अखेर झाली क्रूर हत्या

दहावीच्या विद्यार्थ्याने एका महिलेला तरुणासोबत आक्षेपार्ह अवस्थेत बघितले. यानंतर त्या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे. तेलंगणातील हे प्रकरण आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची हत्या

point

अनैतिक संबंधातून घडला भयंकर प्रकार

Crime News : अनैतिक संबंधांचे बिंग फुटण्याच्या भीतीपोटी एक भयंकर घटना घडली. एका महिलेने आणि तिच्या प्रियकराने मिळून दहावीत शिकणाऱ्या 15 वर्षांच्या मुलाची विष देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिला अपर्णा आणि तिचा प्रियकर अजय या दोघांना अटक केली असून, रवी असे मृत पावलेल्या दुर्दैवी विद्यार्थ्याचे नाव आहे.  पतीपासून विभक्त झालेली अपर्णा  आपल्या आजीकडे राहत असताना तिचे गावातीलच अजय नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले होते.

आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले अन्...

तेलंगणातील खम्मम जिल्ह्यातील ही घटना आहे. रवीने या दोघांना एकांतस्थळी आक्षेपार्ह अवस्थेत एकत्र पाहिले होते आणि आपण या संबंधांची माहिती कुटुंबीयांना सांगू, असा इशारा त्याने त्यांना दिला होता. आपले गुपित घरच्यांसमोर उघड होईल, या भीतीने अपर्णा आणि अजयने मिळून रवीचा कायमचा काटा काढण्याचा कट रचला. ठरल्याप्रमाणे 24 ऑक्टोबर रोजी या दोघांनी रवीला गावाबाहेरील एका निर्जन ठिकाणी नेले आणि तिथे शीतपेयात (कोल्ड्रिंक) तणनाशक मिसळून ते त्याला प्यायला दिले.

हे ही वाचा : अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी सुजय विखे, उपाध्यक्षपदी देशमुख; विखे-थोरात एक्स्प्रेस जोरात!

कसं बाहेर आलं प्रकरण?

हे विषारी शीतपेय प्यायल्यानंतर रवीची प्रकृती अत्यंत खालावली आणि त्याला अस्वस्थ वाटू लागले. कुटुंबीयांनी त्याला तातडीने 25 ऑक्टोबर रोजी खम्मम येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र त्याची प्रकृती अधिकच बिघडल्याने उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुरुवातीला हा प्रकार संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी या घटनेचा सर्व बाजूंनी सखोल तपास सुरू केला.

हे ही वाचा : 13 शिक्षकांची आत्महत्या, 400 कोटींची थकबाकी; पुण्यातील प्रसिद्ध शिक्षणसंस्थेला उच्च न्यायालयाचा दणका

आरोपींना न्यायालयीन कोठडी

पोलीस तपासात अपर्णा आणि अजयचं हे काळं कृत्य उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. अटक केलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.