Viral News : कंटेटच्या नादात विसरले प्रायव्हसी, नको तेच व्हिडिओत रेकॉर्ड

सुशांत काळे

• 08:00 AM • 11 Nov 2026

Viral News : सौरभ जोशी नावाचा एक व्लॉगर त्याच्या एका व्हिडिओमुळे पुन्हा अडचणीत आला आहे. तो नुकताच पत्नी अवंतिका भट्टसोबत गोव्यात सुट्टी घालवण्यासाठी गोव्याला गेला होता. मात्र, यादरम्यानचा एक व्हिडिओ क्लिप व्हायरल जाली होती.

Viral News

Viral News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

व्हिडिओ बनवताना पत्नीचा नको तोच भाग दिसला 

point

युझरकडून सौरभ ट्रोल 

Viral News : सौरभ जोशी नावाचा एक व्लॉगर त्याच्या एका व्हिडिओमुळे पुन्हा अडचणीत आला आहे. तो नुकताच पत्नी अवंतिका भट्टसोबत गोव्यात सुट्टी घालवण्यासाठी गोव्याला गेला होता. मात्र, यादरम्यानचा एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. संबंधित व्हिडिओ हा युट्यूबर पत्नीचा असल्याने मोठा वाद निर्माण झाला, ज्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : AI चा वापर करून लेकीनंच आई-वडील आणि भावाला संपवलं

व्हिडिओ बनवताना पत्नीचा नको तोच भाग दिसला 

नुकत्यात संबंधित ब्लॉगमध्ये सौरव जोशी पत्नी अवंतिकासोबत हॉटेलच्या खोलीची सफर घडवत असतो. जेव्हा तो आपला प्रायव्हेट पूल दाखवण्यासाठी खोलीतून बाहेर येतो, तेव्हा कॅमेऱ्याचा प्रकाश हा अवंतिकावर पडतो, ज्यामुळे तिचा ड्रेस पारदर्शक दिसू लागतो. जाणीवपूर्वक असो वा अजाणतेपणे, सौरवने आपल्या पत्नीचा चुकीच्या अँगलने व्हिडिओ काढला, यावरून त्याच्याच निष्काळजीपणावर प्रश्न उपस्थित होत आहे. 

युझरकडून सौरभ ट्रोल 

संबंधित व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावरील लोकांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. व्हिडिओ रेकॉर्ड करून एडिट केला आणि नंतर अपलोड केला. यानंतर युझरने विचारले की,  "सौरभ जोशी मुद्दाम असे व्हिडिओ पोस्ट करतो का, की अपलोड करण्यापूर्वी तो नीट तपासत नाही? कॅमेऱ्याचा अँगल काय होता?" दुसऱ्या एका युझरने म्हटले की, सौरभनं व्हिडिओ अपलोड करण्यापूर्वी लक्ष देणे गरजेचे होते. 

हे ही वाचा : ऑनर किलिंग प्रकरण! दोन भावांनी मिळून बहिणीचा गळा दाबला, मृतदेह फासाला लटकला अन्...

यापूर्वी देखील अनेकदा सौरव ट्रोल झाला होता. त्याला अनेक प्रसंगाला आणि टिकेला सामोरे जावे लागले होते. काही काळापूर्वी त्याने एक व्लॉग केला होता, ज्यात त्याने ट्रूथ ऑर डेइर या खेळादरम्यान पत्नी अवंतिकाला पाळीव कुत्रा ओरिओच्या भांड्यायातून पाणी पिण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, संबंधित समोर आल्यानंतर अनेक लोकांनी सौरभवर टीका केली होती.