Maharashtra Weather : राज्यातील वातावरण फिरलं, पुन्हा पाऊस घालणार धिंगाणा?

मुंबई तक

• 05:00 AM • 17 Oct 2026

Maharashtra Weather : राज्यात काही भागांत उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज वर्तविण्यात येत आहे, तर काही ठिकाणी पावसासाठी पोषक असे हवामान तयार होणार आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने 17 ऑक्टोबरसाठी जारी केलेल्या अंदाजानुसारचे हवामान..

Maharashtra Weather

Maharashtra Weather

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

राज्यात काही भागांत उष्ण आणि दमट हवानामाचा अंदाज

point

तर काही ठिकाणी पावसाचा अंदाज

Maharashtra Weather : राज्यात काही भागांत उष्ण आणि दमट हवानामाचा अंदाज वर्तविण्यात येत आहे, तर काही ठिकाणी पावसासाठी पोषक असे हवामान तयार होणार आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने 17 ऑक्टोबरसाठी जारी केलेल्या अंदाजानुसार, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र आणि इतर काही भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा विभाग आणि विदर्भात हवामान कोरडं राहणार असल्याची शक्यता आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : नांदेड: माहूर गडावर अपघात, 100 फूट खोल दरीत टेम्पो उलटून तिघांचा अंत

कोकण

मुंबई, ठाण्यात पावसाचा अंदाज नसून हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. रायगड जिल्ह्यांत मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाच्या पावसाचा यलो अलर्ट आहे. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर तसेच इतर घाटमाथा परिसरात पावसाचा अंदाज आहे. विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. पुणे आणि पुणे घाटमाथा परिसरा मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. 

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, नाशिक, नाशिक घाटमाथा आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत हवामान कोरडेच राहणार असल्याची शक्यता आहे. 

मराठवाडा 

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि हिंगोली जिल्ह्यांत 17 ऑक्टोबर रोजी पावसाचा विशेष असा इशारा देण्यात आला नाही. नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. धाराशिवसाठी यलो अलर्टचा अंदाज आहे.  

हे ही वाचा : मुंबईत 12 वर्षीय मुलीने 2 वर्षाच्या मुलीला सहाव्या मजल्यावरून ढकललं, आरोपीच्या आईनं..

विदर्भ 

विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, भंडारा, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने कोणताही अलर्ट वर्तविलेला नाही. नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना कोणताही इशारा वर्तविलेला नाही. हवामान कोरडं राहणार असल्याचा अंदाज आहे.