Maharashtra October Heat : दुसरा मान्सून सुरू, राज्यात कुठे अलर्ट?

मुंबई तक

• 10:22 AM • 16 Oct 2026

महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे. ईशान्य मान्सून दक्षिण भारताच्या काही भागांत सक्रिय होण्यास सुरुवात झाली असून, महाराष्ट्रातही ऑक्टोबरच्या उत्तरार्धात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Maharashtra October Heat

Maharashtra October Heat

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

हवामान विभागाचा नागरिकांना इशारा

point

राज्यात पावसाची हजेरी?

Maharashtra October Heat : महाराष्ट्रात मॉन्सूनच्या परताव्यानंतर ऑक्टोबर हिट आणि ईशान्य (नॉर्थ ईस्ट) मॉन्सूनच्या प्रभावामुळे हवामानात मोठा बदल झाला आहे. वाऱ्यांची दिशा बदलणे, सूर्याचे दक्षिणायन आणि सायबेरियाकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव यामुळे दक्षिण भारतासह महाराष्ट्रात पोषक वातावरण तयार झाले आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे समुद्रावरून येणारी दमट हवा आणि जमिनीवरील कोरडी हवा यांच्यातील संघर्षातून (विंड डिस्कंटिन्यूटी) कोल्हापूर, सोलापूर, पुणे, सांगलीसह विविध भागांत दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हे वाचलं का?

नागरिकांना सतर्कतेचा इशारा

येत्या काही दिवसांत कमाल तापमान 32 ते 34 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता असून, ऑक्टोबरच्या उत्तरार्धात रात्रीच्या तापमानात किंचित घट होऊन रात्री उशिरा गारवा जाणवू शकतो. दीर्घकालीन अंदाजानुसार, बळकट होत असलेल्या एल निनोचा प्रभाव यंदाच्या हिवाळ्यावर राहणार असून हिवाळ्याची तीव्रता कमी होऊन थंडी बेताची आणि दिवस अधिक उष्ण राहण्याचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरामध्ये सध्या उष्णतेच्या लाटेचा (हीट वेव) प्रभाव कायम असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हे ही वाचा : पुण्यातील संदीप हॉटेलवर आयकर विभागाची छापेमारी, जाणून घ्या कारवाईचा संपूर्ण तपशील

पावसाचा येलो अलर्ट

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, शुक्रवार ते रविवारदरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांत ढगाळ वातावरण, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, धाराशीव, लातूर, नांदेड, नागपूर आणि गडचिरोली या भागांचा समावेश आहे. तसेच मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पुण्याच्या घाट परिसरातही काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हे ही वाचा : निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाचा इशारा! 'फालतू बहाणे नको' पुरावे गायब कसे झाले?

घराबाहेर पडू नये

अचानक वाढलेले तापमान आणि तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, त्यामुळे दुपारी एक ते चार या वेळेत विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे. हवामानातील या सततच्या बदलांमुळे सर्दी, खोकला व इतर व्हायरल आजार बळावण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.